ह्या दिवसात फेब्रुवारी मार्च महिन्यात काटेसावर हा वृक्ष फुलांनी बहरतो. पेपरमधे फोटोपण येतात. ह्याच्या फुलांचा माझा अभ्यास होण्याचा योग आला.
1995चे डिसेंबर मधे, वयाच्या 49 वर्षी, माझे हातापायाचे स्नायूतील घट्टपणा जाऊन लूज पडले अगदी 80 वयाचे वृध्दासारखे. ह्या आधी मी एक गोष्ट ऐकली होती.
— एका ट्रक ड्रायव्हरला अपघात होतो म्हणून लोकं त्याला बडवतात आणि तो दुसरे दिवशी मित्रांच्यात येतो, मित्र विचारतात अरे काल तुला एवढा मार बसला आणि तू इथे कसा? त्रास होत नाही का? तो सांगतो कांटेसावरीचे फुल खाल्ले. त्यामुळे त्रास गेला.–
ही 1992 साली ऐकलेली गोष्ट एकदम आठवली. विचार केला मार बसून त्रास होतो तो स्नायुना. म्हणजे हे फुल स्नायुवर काम करते. दैवयोगाने फेब्रूवारी 96 ला आमचे जवळ असणारे काटेसावर फुलले असल्याचे लक्षात आले. मी एक फुल खाल्ले. अतिशय गिळगीळीत लागले तरीपण खाल्ले. रोज एक फुल खात होतो. आठ दिवसांत माझे स्नायुत जोर येऊन पूर्ववत झाले.
ह्यानंतर मी ही फुले सुकवून पावडर करून गोळ्या केल्या. ह्या गोळ्या प्रथम ट्रायल म्हणून श्री आगाशे (वय 82) यांना दिल्या. दुसर्याच दिवशी त्यांचा मला फोन आला. “तुम्ही कसल्या गोळ्या केल्यात ताबडतोब या.” मी घाबरलो व सगळी कामे सोडून त्यांच्याकडे गेलो.एवढे तातडीने बोलावले काय त्रास झाला असे विचारले. त्यांनी मला खुर्चीत बसायला लावले. आणि स्वतः उठून चालायला लागले व म्हणाले, “तुमच्या गोळ्यां घेतल्यावर अर्ध्या तासांतच माझी चाल सुधारली आहे बघा.” त्याच्या चालीत बरीच सुधारणा होती. ते भरभर चालत होते.
ह्या गोळ्यांचा उपयोग चांगला झाला व होत आहे. ह्या गोळ्यांमुळे स्नायुना फायदा होतो, एनर्जी येते, आजारपणा नंतरचा थकवा जातो, असा माझा व माझेकडील पेशंटचा अनुभव आहे. (पेशंट बघितल्या शिवाय मी औषधे देत नाही) साठ वयाच्या पुढील लोकांना खुप उपयोग होतो. व्हायटल एनर्जी वाढते असा अनुभव आहे.
सध्या ह्या फुलांचा सिझन आहे. शहरात ही झाडे लावली जात नाहीत ( आहेत ती तोडली जातात). ही फुले गोळा करून, सुकवून, मिक्सरमधे पावडर करून ठेवून वापरावी. घरच्यासाठी गोळ्या करणे गरजेचे नाही. ही पावडर पाण्या बरोबर वा मधा बरोबर आवश्यकतेनुसार घ्यावी. फुलांचा गुलकंद पण करता येतो व तो पण उपयोगी पडतो.
फोटो बघण्यासाठी लिंकवर क्लीक करा
http://www.google.co.in/search?site=webhp&tbm=isch&oq=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87&aqs=mobile-gws-lite.3.0l5&q=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0#imgrc=7vljf1cdu05g1M:
अरविंद जोशी (बी.एस्सी.)
9421948894
संपूर्ण फुलांची पावडर करायची की फक्त पाकळ्यांची?
आणि काय प्रमाणात कशी घेयची.माझ्या कडे भरपूर फुले आहेत.धन्यवाद जोशी साहेब.
खरोखर खूप एनर्जी वाढते अगदी खरे आहे
यह बात सत्य है मैने भी सेमल के फूल खाए जिससे मुझको बहुत फायदा हुवा, आज मैं 65 साल का हूं और तन्दरुस्त हूं ।
या फुलांची पावडर करायची असल्यास कशी करावी त्याचे जरा मार्गदर्शन करावे. त्याशिवाय या विषयाचे लोकांपर्यंत पोहोचणे कठीण आहे.
आपण दिलेली माहिती अत्यंत उपयोगी आहे यात वादच नाही. शहरातल्या लोकांना या झाडांची व्यवस्थित माहिती पण नाही. त्यांनी ऐकलेला शब्द म्हणजे शेवरीचा कापूस.
याची लागवड सुद्धा शक्य आहे कोकणामध्ये.
परंतु माहितीचा अभाव प्रचंड आहे.
त्यामुळे कृपया माहिती द्यावी.
तुमच्या कार्याला शतः शतः अभिवादन! शारिरीक दुर्बलतेने अडखळणा-या, विशेषतः वृद्धांना नवा आशेचा किरण.
सर ह्या वाळलेल्या फुलाच्या फक्त पाकळ्यांची पावडर करायची की त्यातील पुंकेसर,स्रीकेसरसकट फुलिंची पावडर करायची तसेच त्या फुलाला खाली असलेले calyx काढुन टाकायच का?
अतिशय उपयुक्त माहिती
Good Job Sir
I am proud of you