चि. वि. जोशी यांच्या गुंड्याभाऊची भूमिका गाजविणारे जुन्या जमान्यातील प्रसिध्द नट विष्णूपंत जोग चिं. विं.च्या विनोद बागेतले दोन अफलातून नमुने म्हणजे ‘चिमणराव-गुंडय़ाभाऊ’. या दुकलीची लोकप्रियता आता आतापर्यंत टिकून होती.
दामुअण्णा आणि विष्णुपंत जोग यांचा ‘सरकारी पाहुणे’ हा चित्रपट १९४२ मधला. पहिली मंगळागौर (लता मंगेशकर यांनी अभिनय केलेला पहिला चित्रपट), सरकारी पाहुणे, जय मल्हार, नवरा बायको, देव पावला, बायको पाहिजे, वरदक्षिणा, हे चित्रपट व नाटक झाले जन्माचे हे नाटक ह्या मा.विष्णूपंत जोग यांच्या गाजलेल्या कलाकृती होत.
‘मी गुंड्याभाऊ हे विष्णूपंत जोग यांचे आत्मचरित्र डॉ. मंदा खांडगे यांनी शब्दांकित केले आहे.
विष्णूपंत जोग यांचे २२ जून १९९३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply