संगीतावर हुकूमत गाजविणारा कुशल कलाकार, प्रतिभासंपन्न संगीतकार व जागतिक कीर्तीचे पियानोवादक व्हिताज बलसारा उर्फ व्ही.बलसारा यांचा जन्म २२ जुन १९२२ रोजी झाला.
व्हिताज अर्देशर बलसारा उर्फ व्ही. बलसारा हे पारशी असून सुद्धा व्ही.बलसारा यांनी एकेकाळी आपला हार्मोनियम, ऑर्गन व पियानोच्या अप्रतिम साथीने अवघ्या हिंदी फिल्मी संगीतावर हुकूमत गाजवली.
‘‘भारतीय संगीताचं बाळकडू त्यांना आईकडून मिळालं. तीच पहिली गुरू. संगीताची गोडी त्यांना बालपणापासूनच होती. घरी पियानो नव्हता. गोव्याच्या शिक्षकांनी त्यांना पियानो व व्हायोलिनचं शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं. गायनाचे प्राथमिक धडे त्यांनी फ्रामरोज श्रॉफ व पुढे बडोदा संस्थानचे उस्ताद बच्चूमियाँ यांच्याकडे गिरवले. १९३८ साल होतं. जुहूर राजा यांच्या ‘बादल’ चित्रपटासाठी बरेलीचे खानसाहेब मुश्ताक हुसैन संगीत दिग्दर्शक होते. ध्वनिमुद्रणाच्या वेळी त्यांचा नेहमीचा साजिंदा आला नाही, तेव्हा आयत्या वेळी व्ही. बलसारा पियानो वाजवण्यास बोलवले. तेव्हा वय होतं फक्त १६ वर्ष. व्ही. बलसारा यांच्या वादनशैलीवर खुश होऊन खानसाहेबांनी तिथल्या तिथे माझी दुय्यम सहायक म्हणून नेमणूक केली.’’ व्ही. बलसारा यांनी ‘जिना सिखो’मध्ये पं. हनुमान प्रसादबरोबर, जुहूर राजासाठी ‘मझाक’मध्ये, ‘दोस्त’मध्ये सज्जाद हुसैनबरोबर, ‘रंगमहल’मध्ये मा.दत्ता कोरगावकर यांचा सहायक म्हणून काम केलं. त्यावेळी अॅ रेंजरचं नाव चित्रपटाच्या श्रेयनामावलीत येत नसे. मास्टर गुलाम यांनी व्ही. बलसारा यांना स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळलं. दत्ता कोरगावकर व मदन मोहननी सख्ख्या भावाचं प्रेम दिलं.
शंकर-जयकिशननी तर अगदी ‘बरसात’पासून ते ते मुंबई सोडेपर्यंत एकही गाणं मी ऑर्गन अथवा हार्मोनियमवर असल्याशिवाय ध्वनिमुद्रित केलं नाही. पूर्वी प्रत्येक संगीतकाराची स्वत:ची वैशिष्टय़पूर्ण शैली होती. गाण्याच्या चालीवरून संगीतकार ओळखू येत असे. यामध्ये वादक कलाकारांचा सिंहाचा वाटा होता, हे विसरून चालणार नाही.’’
व्ही. बलसारा यांनी ‘‘‘आऽ इन्तजार हैं तेरा’ (बडी माँ), ‘चकोरी का चंदा से प्यार’ (दामन), ‘कोई प्रेम का दे के संदेसा’ (दोस्त), ‘कैसे कोई जिए’ (बादबान), ‘तारा री यारा री’ (दास्तान), ‘लो प्यार की हो गई जीत’ (जादू), याशिवाय शंकर-जयकिशन यांची ‘आवारा’, ‘बरसात’, ‘बादल’, ‘दाग’, ‘आंस’, ‘आह’, ‘पतिता’, ‘बादशहा’, ‘श्री ४२०’, ‘काली घटा’, ‘चोरी चोरी’ अशा अनेक चित्रपटांतील वाजवलेली गाणी अजून लोकांच्या लक्षात आहेत.’’ मा.व्ही.बलसारा हे पियानो, हार्मोनियमशिवाय व्हायोलिन, मेंडोलिनही वाजवत असत. त्या वादनामध्ये सतत ते निरनिगळे प्रयोग करीत असत. ते हार्मोनियमवर पाश्चिमात्य संगीत वाजव असत, त्यावेळी हार्मोनियमचा सूर अॅ कॉर्डियनसारखा येत असे. उदा. ‘ऐ मेरे दिल कही’ (दाग), ‘याद किया दिलने’ (पतिता) हे गाणं, पियानोवर जेव्हा ते वाजवत असत त्याला भारतीय संगीताची जोड देऊन तेव्हा पियानोवर सरोद, जलतरंग अथवा संतूरसारखा आवाज आणत असत. त्यांनी काउंटर मेलडी वाजवण्याची एक वेगळी शैली निर्माण केली ती सिनेशौकिनांना आवडली.’
१९५३ साली व्ही.बलसारा यांनी ‘‘स्वीट पिक्चर्स निर्मित जगदीश पंतच्या ‘मदमस्त’ चित्रपटात स्वतंत्ररीत्या संगीत दिग्दर्शन केले. त्यातील मा.लता मंगेशकर यांच्या ‘सुनाए हाल दिल का हमारा’ गाण्यात व्हायोलिन्सचा मारा कटाक्षाने टाळण्यात आला आहे. मा.व्ही.बलसारा यांना ‘‘आयझ्ॉक डेव्हिड (स्पॅनिश मेंडोलिन), रामसिंग (सॅक्सोफोन), रामनारायण (सारंगी), अब्दुल करीम लाला (ढोलक व ढोलकी), कर्नाड, नार्वेकर (व्हायोलिन) यांसारखे अनेक कलाकारांनी साथ दिली. व्ही.बलसारा यांचे निधन २४ मार्च २००५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / अरुण पुराणिक
Leave a Reply