नवीन लेखन...

द “बर्निंग” ट्रेन

आनंद देवधर यांचा हा लेख. बुलेट ट्रेनबद्दलची लोकांना सत्य परिस्थिती माहीत झाली पाहिजे या उद्देशाने लिहिलेला आहे.  


ही पोस्ट बुलेट ट्रेन हवी का नको या चर्चेसाठी नाही.ती आताच का , बुलेट ट्रेन ऐवजी हे करा, ते का नाही करत या फंदात मला पडायचे नाही. तेंव्हा त्याबद्दलच्या कॉमेंट्स उडवण्यात येतील.

मोदी यांच्यावर विखारी हल्ले चढवले जात आहे. अहमदाबादच का ? गुजरातच्या निवडणुका आहेत म्हणून हे सगळे होत आहे !! वगैरे वगैरे बोलले जात आहे.

मोदींवर शरसंधान करण्याचा प्रयत्न तर होणारच पण सामान्य माणसाला खरी माहिती मिळावी, टीकेच्या गदारोळात ती दबली जाऊ नये म्हणून मी हे लिहीत आहे.

हे मतप्रदर्शन नाही तर बुलेट ट्रेन प्रोजेक्ट नक्की काय आहे त्याबद्दल फक्त माहिती देत आहे !! काल काही चॅनेल्सवर सुद्धा हे सांगितले. नेटवर सुद्धा माहिती उपलब्ध आहे.

लोक कष्ट घेत नाहीत.मीडिया जे दाखवेल ते किंवा सोशल मीडियावर व्हायरल होते ते या दोहोंच्या प्रभावाखाली येतात म्हणून फेसबुकवर मी ही माहिती देत आहे.

बुलेट ट्रेन प्रोजेक्टची नेटवर उपलब्ध असलेली माहिती संक्षिप्त स्वरूपात खालीलप्रमाणे:

बुलेट ट्रेनचा प्रस्ताव २००८-०९ च्या साली युपीए वनच्या राजवटीत लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना आला.

२००९-१० च्या रेल्वे बजेटमध्ये बुलेट ट्रेनचा फिजिबिलिटी स्टडी करावा असे ठरले.एकूण सहा रुट्स विचाराधीन होते त्यापैकी अहमदाबाद मुंबई पुणे हा एक रूट होता. त्याला प्राधान्य देण्यात आले.

१४ फेब्रुवारी २०१३ रोजी भारत आणि फ्रान्स या दोन देशांच्या रेल्वे खात्यांनी एक “एमओयू” केले ज्याद्वारे संयुक्तरित्या फिजिबिलिटी स्टडी करायचे ठरवले. खंडाळा घाटामुळे खर्च वाढत होता म्हणून हा रूट पुण्यापर्यंत न नेता मुंबईपर्यंत मर्यादित ठेवला.हा निर्णय मार्च २०१३ मधे झाला !!

२९ मे २०१३ रोजी तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग आणि जपानचे पंतप्रधान आबे यांनी एक संयुक्त निवेदन केले.त्यानुसार जपान आणि भारत संयुक्तरीत्या फिजिबिलिटी स्टडी करतील आणि त्याचा खर्चही वाटून घेतील असे ठरले. याबद्दलच्या “एमओयू”वर सप्टेंबर २०१३ मधे हस्ताक्षरे झाली. या अहवालासाठी १८ महिन्यांची मुदत घालून देण्यात आली.

जपानने तांत्रिक आणि ट्रॅफिक संबंधित बाबींचा अभ्यास केला तर फ्रेंच रेल्वेने कमर्शियल बाबी बघितल्या. जपानची टीम जानेवारी २०१४ मधे मुंबईत आली. त्यांनी प्राथमिक भेटीगाठी घेतल्या. काही जागा बघितल्या. २१ जानेवारी रोजी त्यांनी बीकेसी येथे पहिले स्टेशन असेल असे नक्की केले.

एप्रिल २०१४ मधे पहिली मोठी मीटिंग झाली .त्या मीटिंगमधे महाराष्ट्र आणि गुजरात सरकारचे प्रतिनिधी सामील झाले होते. त्यांनी टर्मिनल म्हणून बिकेसीवर शिक्कामोर्तब केले. बिकेसी,ठाणे, दिवा, वसई ,सुरत,वडोदरा, अहमदाबाद असा मार्ग चर्चिला गेला.

दरम्यान भारतात सत्ताबदल झाला. जुलै २०१५ मधे फिजिबिलिटी रिपोर्ट आला. आणि नंतर मोदी सरकारने हा प्रोजेक्ट पुढे नेला. काल त्याचे भूमिपूजन झाले.

बुलेट ट्रेनचे स्वप्न भारत सरकारने बघितले !! लालूप्रसाद यादव यांच्या स्वप्नाची डॉ मनमोहन सिंग यांनी मुहूर्तमेढ रचली आणि नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केले.

सरकार ही एक घटनाधिष्ठित कायमस्वरूपी व्यवस्था असते इतके जरी समजून घेतले तरी डोक्यात प्रकाश पडेल.

— आनंद देवधर

( एक विनंती : ही पोस्ट तुम्ही फॉरवर्ड करा. व्हायरल करा लोकांना सत्य परिस्थिती माहीत झाली पाहिजे.)

Avatar
About जयेश शत्रुघ्न मेस्त्री 12 Articles
हिंदूत्त्व या विषयावर परखडपणे लिहिणारे श्री जयेश मेस्त्री हे व्यवसायाने विमा (एल. आय. सी )आणि गुंतवणूक एजंट आहेत. ते हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..