दर्पण
चित्र दिसते दर्पणी , जसे असेल तसे, धूळ साचता त्यावरी, अस्पष्ट ते होतसे ।।१।। दर्पणा परि निर्मळ मन, बागडते सदैव आनंदी, दूषितपणा येई त्याला, भावविचारांनी कधी कधी ।।२।। निर्मळ ठेवा मन आपले, झटकून द्या लोभ अहंकार, मनाच्या त्या पवित्रपणाने, जीवन होत असे साकार ।।३।। — डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com