नवीन लेखन...

जेष्ठ अभिनेत्री खुर्शीद उर्फ मीना शौरी

जेष्ठ अभिनेत्री खुर्शीद उर्फ मीना शौरी यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९२१ रोजी झाला. सोहराब मोदी यांचा चित्रपट ‘सिकंदर’ मध्ये काम करुन मीना शौरी यांनी आपल्या करीयरची सुरवात केली. सोहराब मोदींनीच खुर्शीदचे मीना नामकरण केले. ‘सिकंदर’ नंतर मीना यांना शौरी यांनी ‘शालीमार’ व महबूब खान यांनी ‘हुमायूं’ मध्ये काम करण्याचा प्रस्ताव दिला. पण अचानक सोहराब मोदी यांनी मीना यांना एक […]

रत्नाकर मतकरी

रत्नाकर मतकरी यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९३८ रोजी झाला. रत्नाकर मतकरी गेली अनेक वर्षे अविरत लेखन करणारे नाटककार, दिग्दर्शक, निर्माते, बालनाटय़ चळवळीचे अध्वर्यु, साहित्यिक, स्तंभलेखक, चित्रकार, चित्रपट व मालिका लेखक, एकपात्री कथाकथनकार अशा विविधांगी भूमिका लीलया निभावणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. प्राथमिक शिक्षण रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये तर माध्यमिक शिक्षण राममोहन इंग्लिश स्कूल मध्ये झालं. १९५४ साली एस. एस. […]

मराठीतील लेखिका व समालोचक कुसुमावती देशपांडे

मराठीतील लेखिका व समालोचक कुसुमावती देशपांडे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९०४ रोजी झाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रावबहादुर रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. प्राथमिक शिक्षण अमरावतीला व पुढचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले. शिष्यवृत्तीसह त्या मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. नागपूर विद्यापीठाच्या बीएच्या परीक्षेत त्यांना सुवर्णपदक मिळाले, आणि मध्य प्रांत-विदर्भ सरकारची (सी.पी. ॲन्ड बेरार सरकारची) विशेष शिष्यवृत्ती मिळवून त्या […]

साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार जेमिनी गणेशन

साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार जेमिनी गणेशन यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९२५ रोजी झाला. जेमिनी गणेशन यांची मुलगी अभिनेत्री रेखा.१९५७ साली त्यांनी ‘मिस मेरी’ या सिनेमाद्वारे बॉलिवूड डेब्यू केले होते. त्यांची या सिनेमात मीना कुमारीसोबत जोडी होती आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. त्यांनी ‘देवता’, ‘राज तिलक’, ‘नजराना’ या सिनेमांमध्ये अभिनय केला. जेमिनी गणेशन यांचे २२ मार्च, २००५ साली निधन […]

जुन्या पिढीतील प्रसिद्ध अभिनेत्री बेबी शकुंतला

जुन्या पिढीतील प्रसिद्ध अभिनेत्री बेबी शकुंतला यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९३२ रोजी झाला. अप्रतिम सौंदर्य आणि चौफेर अभिनयामुळे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत बेबी शकुंतला यांनी आपला दबदबा निर्माण केला होता़ हिंदी चित्रपटसृष्टीतील मधुबाला यांच्या सौंदर्याशी त्यांची तुलना होत असे़. त्यांचे चित्रपटांत येण्यापूर्वीचे नाव शकुंतला महाजन आणि लग्नानंतरचे नाव उमादेवी खंडेराव नाडगोंडे होते. महाजन कुटुंबातील त्या एकमेव कन्या होत्या. […]

अभिनेता सुशांत शेलार

अभिनेता सुशांत शेलार यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९८० रोजी मुंबई येथे झाला. सुशांत शेलार हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव असून ते थिएटर, टीव्ही पण जोडलेले आहेत. मुंबईतून त्यांनी शालेय शिक्षण व महाविद्यालय केले. त्यांनी बालपणी अनेक नाटके व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता १९९१ साली बाल कलाकार म्हणून काम करणारी त्यांची कारकीर्द सुरू झाली. मयूरपंख मध्ये बाल कलाकार […]

बांगलादेशी पार्श्वगायिका रूना लैला

बांगलादेशी पार्श्वगायिका रूना लैला यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९५२ रोजी सिलहट बांगलादेश येथे झाला. भूपिंदर आणि रुना लैला यांनी गायलेलं घरोंदा या चित्रपटातील दो दीवाने शहर में हे गाणं व दमादम मस्त क़लन्दर हे खूपच लोकप्रिय झाले होते. रूना लैला यांनी जयदेव, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल व भप्पी लाहिरी यांच्या बरोबर काम केले आहे. त्यांची काही बंगाली ‘साधेर लाऊ बनाईलो […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..