नवीन लेखन...

वर्तनशैली – भेटवस्तु

भेटवस्तु हा नव्या जगातला जादूई मंत्र आहे. अनेकविध भारतीय सण, राखी, भाऊबीज, जन्मदिवस, प्रमोशन, बाळाचे आगमन, शिक्षकदिन अशा एक का अनेक प्रसंगात भेटवस्तूंची देवघेव होत आहे. नव्या पिढीचे इंटरनेटशी जुळलेले नाते आणि त्यामुळेच जगभराशी वाढलेला दोस्ताना यातून फ्रेंडशिप डे, फादर – मदर डे, व्हॅलेंटाईन डे यासारख्या पाश्चिमात्य दिवसांनी तरुणांना आपलेसे केले आहे. आजची तरुणाई ही चंगळवादी […]

वर्तनशैली – अभिनंदन

माणूस म्हटला की कौतुकाचे, आनंदाचे अनेक प्रसंग स्वत:सह आपल्या परिचित स्नेहीजनात, कुटुंबात अन् या संपूर्ण विश्वात येत असतात. प्रत्येकाला आपल्या भावभावना, सकारात्मकता यांची देवघेव करायला आवडते. यामध्ये अभिनंदन या शब्दानी साऱ्यासाऱ्यांना आपलेसे करता येते. अन् सन्मानाचा बहुमान स्वीकारल्यासारखा सुखद अनुभव दुसरा नाही असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. अभिनंदन या एका शब्दानी दोन अनोळखी माणसांमध्ये […]

वर्तनशैली – कचरा अस्वच्छता

कचरा हा म्हटला तर दुर्लक्षित पण वास्तवात आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडला गेलेला असा घटक आहे की ज्याच्या अस्तित्वाने स्वच्छतेच्या अनेक बाबींमध्ये अडचण निर्माण होते. रोगराई अनारोग्य निर्माण होते. परिसर हा गलिच्छ दुर्गंधीने हैराण तर होतोच पण प्रत्येकाला लाज वाटावी अशी ओंगळवाणी प्रतिमा जगासमोर होते जी हे ‘विश्वची माझे घर’ म्हणणार्‍या भारताला निश्चितच भूषणावह नाही. देश म्हटला […]

वर्तनशैली – बुफे जेवण

अलिकडे सर्रास लग्न, साखरपुडा, बारसं, वाढदिवस, यासारख्या असंख्य कौटुंबिक समारंभात जेवणावळी वा पंगत या हद्दपार होत असून बुफेने अलगद घुसखोरी केली आहे. बुफेचा उद्देश हा आवडीचं पण नेमकंच खाणं हा असला तरी बरेचदा प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेले अनेकविध पदार्थ आणि त्यांची मनमोहक रुपं यांच्या गोतावळ्यात बुफेचा गुंता हा वाढतोच. बुफेसाठी वास्तवात हवेशीर, मोकळी, मुबलक जागा हवी […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..