नवीन लेखन...

कविवर्य प्रा.शंकर वैद्य

त्यांचा जन्म १५ जून १९२८ रोजी ओतूर पुणे येथे झाला.  वयाच्या सहाव्या वर्षापासूनच त्यांना कवितेची गोडी लागली. या आवडीचा पाठपुरावा करता-करता ते काव्यविश्वात रमले. ‘आला क्षण गेला क्षण’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह होता. तर ‘कालस्वर’ हा पहिला काव्यसंग्रह होता. पहिल्या काव्यसंग्रहानंतर तब्बल २७ वर्षांनी त्यांचा ‘दर्शन’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांचे काव्यलेखन केले.

अत्यंत सोपे आणि सहजसुंदर शब्द हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. अगदी नवखा वाचकही त्यांच्या काव्याशी पटकन जोडला जायचा. शंकर वैद्य यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे नव्या लेखक, कवींबरोबरच विद्यार्थ्यांचा गोतावळा नेहमीच त्यांच्याभोवती असायचा. केवळ कवी म्हणूनच नव्हे तर उत्तम समीक्षक, शिक्षक, ललित लेखक, उत्तम वक्ते व सूत्रसंचालक म्हणूनही ते सर्वपरिचित होते. शंकर वैद्य यांना तल्लख स्मरणशक्तीचे वरदान लाभले होते. त्यांचे सूत्रसंचालन हा साहित्य रसिकांसाठी अवर्णनीय अनुभव असायचा. भूतकाळातील काव्य लेखनाचे अनेक किस्से ते साहित्य रसिकांपुढे जसेच्या तसे उभे करायचे. ‘आला क्षण गेला क्षण’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह.

२७ वर्षानंतर ‘कालस्वर’ हा पहिला काव्यसंग्रह त्यांनी प्रसिध्द केला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांचे काव्यलेखन केले. अनेक वर्षे त्यांनी महाविद्यालयांमधून प्राध्यापकीही केली. शंकर वैद्य यांनी काव्य विश्वात स्वत:चा अमीट ठसा उमटवला होता. शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी ज्वाला, दहा दिशांच्या हदयांमुधुनी अरुणोदया झाला…, स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, पालखीचे भोई या त्यांच्या कविता आजही रसिक प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. कविता, कथांबरोबरच त्यांनी काही चित्रपटांसाठी गीतेही लिहिली होती.

“गोष्ट धमाल नाम्याची‘, “चिमणराव गुंड्याभाऊ‘ या चित्रपटांतील गीते त्यांच्या लेखणीतून उतरली होती. कवी, गीतकार, सूत्रसंचालक, उत्तम वक्ता, समीक्षक, ललित लेखक असे ते बहुपेढी व्यक्तिमत्त्व होते. शंकर वैद्य यांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार, अनंत काणेकर पुरस्कार, कोकण मराठी साहित्य पुरस्कार, वाग्विलासिनी दीनानाथ प्रतिष्ठान पुरस्कार, भा. रा. तांबे पुरस्कार, पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांनी सॅन होजे येथील पहिल्या विश्वर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. शंकर वैद्य यांचे २३ सप्टेंबर २०१४ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4227 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..