कोल्हापूरचा दगडू

जन्ता पेण यांच्याकडून … आम्ही साहित्यिक द्वारे !!!!

कोल्हापूरचा दगडू.
रोज चिकन मटण खायची सवय…
पुण्यात आल्यावर सदाशिव पेठेत जागा मिळाली…जरा सेटल झाल्यावर दगडू
रोज मांसाहार करू लागला…
घमघमाट सर्व बिल्डिंगमध्ये पसरत होता, सगळे शेजारि आपापसात तक्रार करु लागले…
पण रांगड्या बहाद्दराच्या नादि लागणार कोण?
शेवटी गोगटे काकांनी जबाबदारी घेतली..
समजावल्यावर दगडू म्हणाला,
“काका मी रानावर वाढलेला, लहानपणापासून हेच खात आलोय, ती सवय कशी सुटेल?”
काका म्हणाले, “अरे बाळ, तू पूर्वी वेगळ्या संगतीत होतास, आता तु अस्सल विद्वानांमध्ये आला आहेस !! तुला कळतय का तू किती भाग्यवान आहेस ते?!!”
शब्दाने शब्द वाढला पण निष्कर्ष निघेना..
शेवटी काका म्हणाले, “ह्यावर एकच उपाय तू शाकाहारी बनले पाहिजेस”
तो म्हणाला, “हे कसे शक्य आहे?”
काकांनी थोडंसं पाणी घेतले, शांतपणे डोळे मिटले, दिर्घ श्वास घेऊन त्यांनी नमस्कार केला…
पुन्हा थोडे पाणी घेऊन ते दगडूवर शिंपडून ते म्हणाले, “तू धनगर म्हणून जन्माला आलास , धनगर म्हणूनच वाढलास, पण आता तू ब्राम्हण आहेस …!!”
भारावून गेलेला दगडू, काकांच्या पाया पडला…
काकांनी त्याला मनापासुन आशिर्वाद दिले आणि सोसायटीची एका त्रासापासुन सुटका झाल्याचा निश्वास सोडला…
संध्याकाळी जोशिंनी हळूच काकांना सांगीतले की त्यांनी दगडूला दूकानातून चिकन घेउन येताना पाहिले…
तावातावाने जोशी अन् गोगटे दगडूकडे आले…
तर खरेच स्वच्छ धुतलेलं चिकन ताटात ठेऊन पाठमोरा उभा असलेला दगडू त्यांना दिसला…
काका काहि बोलणार ईतक्यात…
……दगडूने हातात पाणी घेतलं आणि ताटावर शिंपडून दगडू म्हणाला, “तू कोंबडी म्हणून जन्माला आलीस , कोंबडी म्हणूनच वाढलीस…
……पण आता तू कोबी आहेस…!!!”

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…