नवीन लेखन...

कंटकारी / डोर्ली …एक अनुपम्य औषधी..!

Kantakari / Dorli - An Ayurvrvedic Medicinal Plant

आपल्या सभोवती अनेक वनस्पती असतात, परंतु त्यांच्या उपयोगाबाबत माहिती नसल्याने आपण त्या वनस्पतींना कचरा समजून बसतो. ह्याच वनस्पतींच्या माध्यमातून औषधी निर्माण करणाऱ्या कंपन्या योग्य उपयोग करून लाखो रुपये कमवितात. ग्रामीण भागात उपलब्ध असणाऱ्या वनस्पतींच्या उपयोगाबाबत, ग्रामीण जनता अनभिज्ञ असल्याने त्याचा जोड-व्यवसायासारखा उपयोग करत नाही. पर्यायाने औषधी खरेदी करतांना अनावश्यक किंमत मोजावी लागते.

सहजतेने उपलब्ध होणाऱ्या वनस्पतींच्या उपयोगाबाबत जनजागृती वाढविली गेली तर ग्रामीण भागात रोजगार निर्मिती सोबतच भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देता येईल. भारतातील शेकडो उपचार पद्धतींपैकी प्रभावशाली एक म्हणजे आयुर्वेदिक उपचार पद्धती होय. आयुर्वेदाला लाखो वर्षांचा इतिहास आहे, हजारो औषधी वनस्पतींच्या उपयोगाबाबत आयुर्वेदात उल्लेख आहे, यापैकीच एक म्हणजे कंटकारी होय. ह्या वनस्पतीच्याबाबत प्राचीन ग्रंथामध्ये पुढील उल्लेख आढळतात-

” वरुणार्तगलशिग्रु मधु शिग्रु  तर्कारीमेषश्रुंगी पुतीकनक्तमाल…|| ”    (सृश्रुत)
” कंटकारीकृतः क्वाथः सकृष्णः सर्वकासहा | ”   (भैषज्य रत्नावली)
” त्रिकंटक बलाप्या व्याघ्री गुद्नाग रसाधीतम्
वर्चीमूत्र विबन्धध्नं शोथज्वर हरं पयं  | ”    (चरक)

असे विविध उल्लेख असलेल्या ह्या वनस्पतीचे वेगवेगळी नावे आहेत-

कुळनाव- Solanaceae       Latin Name – Solanum Virginianum L
संस्कृत नाव- कंटकारी, श्वेता, क्षुद्रा, चंद्रहास, लक्ष्मणा
मराठी नाव- डोर्ली, कंटकारी, जंगली वांगे, रानवांगी
हिंदी नाव- कंटकारी, जंगली बैंगन, वृहती, कटेरी, लघुकाई, भटकटय्या
English Name – Yellow berried night shade.  अशी वेगवेगळी नावे आहेत.

सामान्यतः रस्त्याच्या कडेला उकिरड्यावर आढळणारी ही वनस्पती महाराष्ट्र,आंध्रप्रदेश, कर्नाटक,गुजरात, पश्चिमबंगाल (बंगदेश) आदी प्रदेशात प्रामुख्याने आढळते.

रासायनिक घटक-  या वनस्पतीच्या पंचांगाच्या राखेत पोटेशियम नाईट्रेट, पोटेशियम कार्बोनेट, पोटेशियम सल्फेट आढळते. पंचांगामध्ये वसा तसेच राळयुक्त पदार्थ व डायोस्जेनीन मिळते. फळांमध्ये सोलसोजेनीन  आणि बियांमध्ये पिवळसर रंगाचा १९.३ टक्के तेल आढळते.

उपयोग- विविध आजारांवरील औषध निर्मितीत जसे-डोके दुखी, अपस्मार, नेत्रविकार, दात दुखी, इंद्रलुप्त ( डोक्यावरील केश नष्ट होणे), खोकला, दम, कंठशोथ, क्षयकास, वमन,  सर्दीपडसे, मंदाग्नी, पोटाचे विकार, मूत्रखडा,  मुत्रकुच्छ (लघवी थांबणे), गर्भपात, गर्भधारणासंबंधी विकार, मिरगी, ज्वर अशा विविध विकारांवरील औषधी निर्मितीत ह्या वनस्पतीचा मोठ्या प्रमाणात वोर करण्यात येते. तसेच संतती नियमनाच्या  व जीवनावश्यक औषधी निर्मितीत उपयोग होतो.

ह्या वनस्पतीचे व्यावसायिक तत्वावर उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना अधिक फायधा होऊ शकते. दर एकरी २० ते २२ क्विंटल उत्पादन देणाऱ्या ह्या वनस्पतीची फळे बाजारात ५०० ते ८०० रुपये क्विंटल दराने विकली जातात. अधिक उत्पादन घेण्यासाठी ह्या वनस्पतीचे सुधारित वाणही उपलब्ध आहेत, जसे-  आर.एल.एल.-२०, आर.एल.एल.-६  तसेच चनेरजीनम.

दिवसेंदिवस आजारांचे प्रमाण वाढत आहे परंतु त्या प्रमाणात औषधी उत्पादन होत नाही त्यामुळे अवास्तव किंमत मोजून औषधी घ्यावी लागते. ह्या सर्व बाबी टाळण्यासाठी व आर्थिक उन्नती साधण्यासाठी औषधी शेतीचे क्षेत्र वाढणे आवश्यक आहे. शिवाय या प्रयोगाने शेतकऱ्यांचीही उन्नती साधता येईल.

नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
About नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश 78 Articles
व्यवसायाने शिक्षक असलेल्या श्री नरेंद्र लोहबरे यांना विविध विषयांवर लेख तसेच कविता लिहिणे फार आवडते. देशविदेशातील प्राचीन तथा अर्वाचीन नाणे व चलनाचा संग्रह करण्याचा त्यांना छंद आहे. पर्यटन, पक्षी निरीक्षण, छायाचित्रण, रक्तदान करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आदी बाबींचेही छंद आहेत. आयुर्वेदिक वनस्पतींचे जतन करणे आवडीचा विषय आहे.

2 Comments on कंटकारी / डोर्ली …एक अनुपम्य औषधी..!

  1. यानंतर लेख टाकतांना चित्र टाकण्याचा काशोसीने प्रयत्न करीन.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..