नवीन लेखन...

डॉ.संजय गोविंदराव पोहरकर – एक अष्टपैलू व्यक्तिमत्व…!

८ जुलै हा डॉ.संजय पोहरकरांचा जन्मदिवस, दि. ८ जुलै २०१२ रोजी सरांचे वयाच्या ५१ व्या वर्षात पदार्पण होत आहे. संघर्षमय जीवनाची वाटचाल करतांना यशाची कितीतरी शिखरे सहजगत्या पादाक्रांत केलीत, अशा यशस्वी व्यक्तींपैकी एक म्हणजे, डॉ.संजय पोहरकर होत.

डॉ.संजय पोहरकर हे, “राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी” द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी, जि.भंडारा या ठिकाणी प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक ते महाविद्यालायाचे प्राचार्य आणि पी.एच.डी. चे मार्गदर्शक असा चढता जीवनाचा आलेख आहे.

सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या संजय पोहरकरांनी, शालेय जीवनापासूनच स्वतःला आसाम बचाव आंदोलन, वंदे मातरम्‌ आंदोलन, १८ व्या वर्षी विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा, तिबेट स्वातंत्र्य आंदोलनाला सक्रीय पाठींबा, स्वदेशी जागरण मंच अशा विविध आंदोलनाशी जोडून घेतले. पोहरकरांनी शिक्षण क्षेत्रात काम करतांना, भारतीय इतिहास संकलन योजना, मराठी प्राध्यापक परिषद, विद्यापीठ शिक्षण मंच अशा विविध ठिकाणी योगदान दिले आहे. लाखनी सारख्या ठिकाणी “जैवतंत्रज्ञान” (Bio-Technology) सारखा विज्ञान शाखेतील विषय विद्यार्थ्यांना शिकता यावा म्हणून विशेष प्रयत्न केलेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती नागपूर च्या वतीने तेजोनिधी सावरकरांच्या विचारांचा प्रचार, प्रसार करण्यासाठीच आपले जीवितकार्य आहे, असे गृहीत धरून जीवन जगणाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी “स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार” दिला जातो. “स्वातंत्र्यवीर सावरकर व अन्य विषयांवर” विदर्भात ५०० पेक्षा जास्त व्याख्याने देणाऱ्या डॉ.संजय पोहरकर यांना, हा पुरस्कार सन २०१२ या वर्षात देण्यात आला. “ सावरकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार हेच आपले जीवित कार्य समजणे म्हणजे, कोणा व्यक्तिमत्वाला आंधळेपणाने वाहिलेली निष्ठा नव्हे, तर पदरात निखारे घेऊन तारेवरून चालण्याची कसरत करणाऱ्या सतीचं जगणे होय..! ”

याची जाणीव झाल्यामुळेच, नाशिकच्या ९१ वर्षाची परंपरा असणाऱ्या “ वसंत व्याख्यानमालेत ” सावरकरी विचारांचे पुष्प गुंफण्यासाठी संजय पोहरकरांना २०१२ या वर्षात विशेषत्वाने पाचारण करण्यात आले. टिळक, आगरकरांनी ज्या व्याख्यानमालेत आपले विचार मांडलेत; त्या मंचावर उभे राहण्याच्या विचारानेही कितीतरी गर्भगळीत होतात, तिथे अधिकारवाणीने आपले विचार निर्भीडपणे अभिव्यक्त करणारा आत्मा म्हणजे संजय पोहरकर होत.

भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवराय, स्वामी विवेकानंद, डॉ. हेडगेवार यांना आपले प्रेरणास्त्रोत मानणारे संजय पोहरकर, सातासमुद्रापलीकडील डॉ.जार्ज वाशिंगटन कार्व्हर यांना चरित्र प्रेरणास्त्रोत किवां प्रेरकशक्ती मानतात. यात विचारांची विश्वव्यापकता निश्चितच पहावयास मिळते.

पु. भा. भावे, केशवसुत, कुसुमाग्रज यांच्या लेखणीला पूजनाऱ्या संजय पोहरकर यांनी, ‘सावरकर काव्य मीमांसा’, ‘आता पेटवू सारे रान’, ‘संवाद कौशल्य’, मुलांसाठी सावरकर ही पुस्तके आणि ‘देव आंघोळीला गेले’, ‘कलियुगातील ध्रुवतारा’ ही काव्यसंग्रह समाजाला दिलेत. ज्यांच्यावर साक्षात वाग्देवीचा वरदहस्त आहे, अशा संजय पोहरकरांच्या मुखार्विन्दातून निघालेले शब्दामृत कोणालाही मोहित केल्याशिवाय राहणार नाही.

“ हिंदुत्ववादी समीक्षा ” ज्यांच्या लेखणीतून साकारण्याची समाज वाट पाहतोय त्या डॉ.संजय पोहरकरांच्या ५१ व्या वर्षात पदार्पनाचे शतशः स्वागत. पुढील निरामय, आरोग्यदायी, संपन्न आयुष्यासाठी कोटी-कोटी शुभेच्छा…!!!

— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश

नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
About नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश 78 Articles
व्यवसायाने शिक्षक असलेल्या श्री नरेंद्र लोहबरे यांना विविध विषयांवर लेख तसेच कविता लिहिणे फार आवडते. देशविदेशातील प्राचीन तथा अर्वाचीन नाणे व चलनाचा संग्रह करण्याचा त्यांना छंद आहे. पर्यटन, पक्षी निरीक्षण, छायाचित्रण, रक्तदान करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आदी बाबींचेही छंद आहेत. आयुर्वेदिक वनस्पतींचे जतन करणे आवडीचा विषय आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..