नवीन लेखन...

दिक्षित की दिवेकर – कोणाबरोबर जाऊ ?

सुंदरता म्हटली कि डोळ्यासमोर येते ती नाजूक शेलाटी बांध्याची स्त्री आणि भारदार शरीरयष्टी असलेला पुरुष. रस्त्यात कोणी मित्र मैत्रीण भेटली आणि तिने नुसत म्हटलं कि सध्याची लाईफस्टाईल चांगलीच मानवलेली दिसतेय, मग  मानवलेली लाईफस्टाईल कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरु होतात. तुम्ही नुसतं ह्या विषयी एखाद्याला विचारलं कि लगेचच तो सुरु होता, अमक्याने हा डाएट केला तर तमक्याने तो डाएट केला त्याच एवढं वजन कमी झालं. कोणी हॉलिवूड डाएट तर कोणी दीक्षित डाएट करण्याचा सल्ला देत. प्रत्येकजण वेगवेगळा सल्ला देतात. बरं ते ह्या विषयावर इतकी ठामपणे चर्चा करतात मग आणखीनच confusion  वाढतं.  जे कोण सांगेल ते सगळे उपाय करून बघितले जातात पण काही फायदा होताना दिसत नाही. ह्या संदर्भातच मी माझे काही विचार मांडणार आहे.

सध्या व्हाट्सऍप वर ह्यासंदर्भात वेगवेगळे मेसेजेस परत परत येताना दिसतात. मनात येत कि वजन घटवणं इतकं सोपं असत तर मग लोकांना सर्जरी का करायला लागली असती? एवढ्या बेरियाट्रिक सर्जन्सनी काय केलं असत?  सध्या प्रामुख्याने चर्चेत असलेल्या २ आहाराच्या बद्दलची मला असलेली माहिती माझ्या मित्र मैत्रिणीनं बरोबर शेअर करायला मला खूप आवडेल म्हणून ह्या लेखाचं प्रपंच

सध्या प्रामुख्याने चर्चेत असलेल्या २ आहार पद्धती

१. दिक्षीत डाएट

२. दिवेकर डायट म्हणजे आपला मित्र जयंत दिवेकर नसून ऋजुता दिवेकर

दिक्षीत डाएट

दिक्षीत सांगतात दोनच वेळेसच ५५ मिनिटांच्या आत  जेवा. त्यात मग तुम्ही काही खाल तरी चालेल. अगदी ताटभर भाजी, डायबेटीसवाल्यानी  गोड  खाल्लं तरी चालेल. असं दोनवेळेसच जेवून म्हणे वजन कमी होत Pre-diabetes  नाहीसा  होतो,  साखर एकदम कंट्रोलमध्ये येते. ह्याच्यावर आभ्यासकांनी काही सायन्टिफिक प्रयोग केलेत का हे शोधण्याचा प्रयत्न केला पण उत्तर मात्र सापडल नाही. ज्यांच्या इन्स्पिरेशनी त्यांनी हा प्रयोग सुरु केला त्या डॉक्टर श्रीकांत जिचकरनी तर दीर्घ काळ जगायला हवं होत पण त्यांचं निधन पन्नाशीच्या आतच झालं,  असं का असू शकेल?

माझ्या आजवरच्या ह्या विषयीच आभ्यास आणि ह्या क्षेत्रात केलेले विविध प्रयोग असं सांगतात कि सुरवाती सुरवातीला तुम्हाला ह्याचा खूप फायदा होताना दिसेल तुमचं वजनही बऱ्यापैकी कमी होईल पण ते कायमच राहील कि नाही हे सांगता येणार नाही आणि सगळ्यांमध्येच हा बदल दिसेल असं हि नाही. ह्यासंदर्भात त्याच्या काही मुद्द्यांविषयी माहिती घेऊ या.

कार्बोहैड्रेट व इन्सुलिन थियरी

त्यांच्या  म्हणण्यानुसार  ५५ मिनिटांनंतर  परत  इन्सुलिन  तयार  होते  म्हणून  तुम्ही  २ वेळेस जेवा.  असं असेल  तर  मग  fasting  इन्सुलिन वाढण्याचे कारण काय?

रिसर्च  असे  दाखवतो जेवढे आपण  खाणे  खातो  आणि  जितकी  कार्बोहायड्रेट्स  खातो  त्या  प्रोपोरशन प्रमाणेच किंवा  iso-caloric meal  घेतल्यास  त्यातील अन्नघटकांना   अनुसरूनच  शरीर  इन्सुलिन  तयार  करत.

वजनाच्या बाबतीत ते सांगतात कि तुम्ही दोन वेळेस खाल्यास ३ महिन्यात तुमचे ८ किलो वजन घटते. ह्या proportion ने वर्षाला जवळजवळ ३२ किलो वजन घटायला हवे पण इतक्या वर्षांच्या कारकिऱदीत मी weight reducing चा कोणताच डाएट एवढे वजन कमी करताना पहिलेला  नाही.  तुम्ही  कोणत्याही  प्रकारचा  डाएट करा,  प्रथम  लवकर  वजन  कमी  होते  पण नंतर शरीराला  आवश्यक असलेली एनर्जी conserve करण्यासाठी  कमी  खाऊन  देखील  त्या कॅलरीज शरीरातच साठवल्या जातात म्हणून हळूहळू वजन घटण्याची प्रोसेस थांबते.

२ वेळेस जेवण

२ वेळेसच खाणं म्हणजे आपसूकच मध्ये मधे खाण्यात येणारे पदार्थ वर्ज्य म्हणजेच अरबट चरबट खाण बंद, त्यामुळे आपोआपच कॅलरीज कमी खाल्ल्या जातात आणि २ वेळेस खाल्यामुळे नाहीतर कमी कॅलरीजचा सेवनाने वजन कमी होते कारण Weight = Balance between calorie in & Calorie Out.

२ वेळेस  जेवून  किंवा  ६ वेळेस  थोडेथोडे  खाऊन  त्याचा  शुगर व वजनावर  काय परिणाम  होतो ह्या संदर्भात २०१४ मध्ये  रिसर्च  केला  तेव्हा  ६ वेळेस  थोडेथोडे  खाणाऱ्यांच्या  वजनात आणि  fasting blood sugar  मध्ये  घट  झालेली आढळली. तसेच Diabetes Care  ह्या  जर्नल मध्ये  २ वेळेस  जेवण  घेतल्यावर  glucose   आणि  इन्सुलिन  वाढलेले  आढळले  आणि  जेव्हा  तोच आहार   isocaloric ६ वेळेस दिला तेव्हा  दोन वेळेसच  खाण्यापेक्षा  ६ वेळेस दिलेल्या आहारात weight  &  शुगर वर चांगले  नियंत्रण मिळालेले आढळले.

दिवेकर डाएट:

ऋजुता दिवेकर करीना कपूरच्या zero figure मुळे सर्वांच्या परिचयाची झाली. आता मात्र करीना zero figure maintain  करू  शकली  नाही हे मात्र खरं. असं का बरं?

ती सांगते  दर  २  तासानी खा,  डायबेटिस  असलेल्या  व्यक्तिनी आंबा  खाल्ला तरी चालेल.

लवकरच आंब्याचा सिझन सुरु होणार आणि बरेच लोक त्याला व्हिलन ठरवणार. ऋजुताच्या सांगण्याप्रमाणे diabetic  लोकांनी आंबा खाल्लंतरी चालेल. मी हि तिच्या मताशी सहमत आहे. मग शुगर का वाढते?  ह्याच कारण जेवणात आमरस असला कि २-३ पोळ्यांचा सेवन जास्त होत,  आमरस कधीतरीच मिळतो म्हणून आमरस आणि पोळी,  भाजीला सुट्टी. मग साखर कशी कमी होणार? कारण जास्त पोळ्या म्हणजे जास्त एनर्जी,  भाजी नाही म्हणून त्यातील फायबर नाही,  आणि त्यामुळे साखर त्यातील चोथ्या बरोबर शरीरा बाहेर टाकली जाणार नाही. मग सांगा बरं कश्यामुळे साखर वाढली? अगदी बरोबर ती आंब्यामुळे नाही तर इतर कारणांमुळेच. म्हणूनच मी तिच्या मताशी सहमत आहे. एकच नमूद करू इच्छिते कि आंबा खायचा असेल तर तो प्रमाणात घ्या, म्हणजे आंब्याचा आनंद हि घेता येईल आणि साखरही कंट्रोल मधे राहील.

करीना कपूरच्या zero figure  मुळे प्रकाशझोतात आलेल्या ऋजुताचा सल्ला मनावर घेऊन बरेच जण दर दोन तासांनी खायला लागले. ती जे मीडियावर सांगायला लागली तस लोक follow  करू लागले. एवढी छान zero figure झाली असताना मग करीना कपूर ती का सांभाळू शकली नाही?  माझ्या इथंवरच्या अनुभवा वरून असं वाटत कि करीना तो आहार continue  करू शकली नसणार म्हणूनच तीच परत वजन वाढलं असणार.

ह्या दोन्ही पद्धतीवरून खेदाने असच नमूद करावं लागतंय कि वजन घटवण्यासाठी कोणत्याही आहार पद्धतीचा वापर करा, पण तो तुम्हाला कायम करता येईल असाच निवडा कारण घटलेले वजन कायम घटलेले राहण्यासाठी तो उपयोगी ठरावा.

ह्या डाएटना अनुसरून मला काही ओळी सुचल्या त्या अशा…..

पडले संभ्रमात मी
दिक्षित कि ऋतुजा,  ऋतुजा कि दिक्षित
एक सांगते दर दोन तासांनी खा
दुसरे सांगतात २ वेळेसच खा.
पडले संभ्रमात मी

खाऊन बघितले दर तासांनी दोन
जेवून बघिले वेळा दोन
वजन काही हलेना
दमले मात्र प्रयोग करताना
पडले संभ्रमात मी

— डॉ. शीतल म्हामूणकर 

Doctor Sheetal Mhamunkar
Clincal Dietician & Consultant Sports Nutritionist
Preventa Clinic  Wellness for Everyone

Avatar
About डॉ. शीतल म्हामुणकर 20 Articles
डॉक्टर शीतल म्हामुणकर ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आहेत. त्या या क्षेत्रात ३० हून अधिक वर्षे कायरत असून क्रिडापटूंसाठी आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच काम केले आहे. डॉ. म्हामुणकर या प्रिव्हेंटा क्लिनिक या संस्थेच्या संचालिका आहेत. आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..