नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

भूपेन हजारिका

आज ५ नोव्हेंबर..आज आसामी संगीताचे पितामह भूपेन हजारिका यांची पुण्यतिथी. भूपेन हजारिका यांचा जन्म ८ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. मा. हजारिका यांचा सदिया येथे एका शिक्षकाच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शिक्षणात उत्तम गती असलेल्या हजारिका यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बी.ए. व एम. ए. केले. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशन विषयातील पीएचडी केली. शिकागो विद्यापीठाची त्यांना लिस्ले फेलोशीप मिळाली होती. […]

बॉलीवुडचा आयर्न मॅन, अभिनेता मिलिंद सोमण

मिलिंद सोमण यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९६५ रोजी स्कॉटलंडमध्ये झाला. तो पहिली सात वर्षे इंग्लंडमध्ये राहिला. नंतर त्याचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले. मिलिंदला कारकीर्दीच्या सुरूवातीला जलतरणपटू व्हायचे होते. त्याने विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. व्यायामाने कमावलेली पिळदार शरीरयष्टी लाभलेल्या मिलींदला ठाकरसी फॅब्रिक्सची पहिली जाहिरात मॉडेल म्हणून मिळाली आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले. गायिका अलिशा चिनॉय हिच्या मेड इन इंडिया या संगीत व्हिडीओत केलेल्या […]

अप्पासाहेब पटवर्धन

कोकणचे गांधी’ म्हणून प्रसिद्ध असलेेल अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८९४ रोजी झाला. अप्पासाहेब हे देशभरात मुख्यत: रचनात्मक कामाबद्दल ओळखले जातात. त्यांनी ‘कुणबी सेवा संघ’ काढला. ते ‘चरखा संघा’चे तर अध्यक्षच झाले होते. त्यांनी रत्नागिरीत सूतकताई व ग्रामोद्योग प्रसाराचे बहुमोल काम केले. त्यांनीच जिल्ह्यात काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवली. ते जिल्हा काँग्रसचे अध्यक्षही होते. ते स्वातंत्र्य चळवळीत सुमारे साडेतीन वर्षें तुरुंगात होते. त्यांनी त्यांना […]

एक यशस्वी मित्र

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रत्येक रविवारी दुपारी ३.३० ते ४.३० सादर होणाऱ्या ‘दुसरी बाजू’ ह्या मुलाखतीवर आधारित कार्यक्रमात श्री. विक्रम गोखले त्याच्याशी विविध विषयांवर गप्पा मारत असताना माझं मन आठवणींच्या हिंदोळ्यांवर झुलू लागलं आणि काही वर्षांपूर्वी लिहिलेला माझा हा लेख आपल्या सर्वांसमोर ठेवण्याची इच्छा झाली. एक यशस्वी मित्र ३० वर्षांपूर्वी एका भारतीय कंपनीत कृषी अधिकारी म्हणून मी […]

मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक विश्राम बेडेकर

विश्राम बेडेकर आज मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांची पुण्यतिथी विश्राम बेडेकर यांचा जन्म १३ ऑगस्ट १९०६ रोजी झाला. नाटककार, कादंबरीकार, चित्रपट दिग्दर्शक म्हणून आजही ज्यांचे नांव आदराने, सन्मानाने घेतले जाते, त्या विश्राम बेडेकरांचे हे वयाच्या पंचविसाव्या वर्षी लेखनास प्रारंभ केला आणि नव्वदाव्या वर्षापर्यंत ते लिहीत राहिले असले तरी त्यांचे लेखन मोजकेच आहे. चित्रपट क्षेत्रात कारकीर्द सुरु […]

ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव

आज १ नोव्हेंबर… ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकी. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे […]

पद्मीनी कोल्हापुरे

अभिनयाबरोबच गाणं गाण्याची आवड असणारी अभिनेत्री म्हणजेच पद्मिनी कोल्हापुरे, असं म्हणता येईल. […]

विनोदी अभिनेता शरद तळवलकर

आज १ नोव्हेंबर..  शरद तळवलकर यांची जयंती.  शरद तळवलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९१९ झाला. शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस रणदुंदुंभी नाटकातील शिशुपाल आणि साष्टांग नमस्कार या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली. छापील संसार नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत […]

1 359 360 361 362 363 378
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..