अमृता प्रीतम यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९१९ रोजी झाला. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी महत्त्वपूर्ण साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. त्यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोळाव्या […]
अभिनयाबरोबच गाणं गाण्याची आवड असणारी अभिनेत्री म्हणजेच पद्मिनी कोल्हापुरे, असं म्हणता येईल. त्यांचा जन्म १ नोव्हेबर १९६५ रोजी झाला. गायनाची आवड असणा-या पद्मिनीने लहानपणापासून अनेक सिनेमांमध्ये गाणी गायली आहेत. लहान असतानाच आपल्या बहिणीबरोबर त्यांनी ‘यादोंकी बारात’,‘दुष्मन दोस्त’ या चित्रपटांसाठी गाणी गायली. राज कपूर यांच्या १९७७ साली आलेल्या ‘सत्यम, शिवम, सुंदरम’ या सिनेमामध्ये त्यांनी केलेली भूमिका खूप गाजली. लहानपणी ‘साजन […]
प्रो.बी आर.देवधर यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकलेल्या अरुण पौडवाल यांनी एस.डी.बर्मन ,कल्याणजी आनंदजी ,लक्ष्मीकांत प्यारेलाल ,बाप्पि लाहिरी, आर.डी.बर्मन यांच्याकडे अॅकॉर्डीयन वादन केले. संगीत संयोजन करताकरता अरुण पौडवाल यांनी १९७१ मधे संगीतकार म्हणून आशा भोसले यांच्या आवाजात एक ध्वनिफीत केली.”ओटीत घातली मुलगी विहीणबाई ”गदिमांनी केलेली हि विहीण पारंपारिक होती पण नवेपण घेऊन आली होती.”हरीनाम मुखी रंगते”हे गोड भक्तीगीत […]
यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकी. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले. यशवंत देव यांचा प्रवास गाण्यातून कवितेकडे […]
शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस रणदुंदुंभी नाटकातील शिशुपाल आणि साष्टांग नमस्कार या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली. छापील संसार नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत असतांना त्यांनी मिलीटरी अकौंटस् मध्ये नोकरी केली. त्यावेळेस […]
राहुल देशपांडे यांचे आजोबा पं वसंतराव देशपांडे हे संगीत रंगभूमीवरचे नावाजलेले व्यक्तिमत्व. त्यांचा जन्म १० आक्टोबर १९७९ रोजी झाला. श्री. राहुल देशपांडे यांनी आजोबांच्या गायकीचा वारसा समर्थपणे पेलला आहे. राहुल देशपांडे यांच्यावर संगीताचे संस्कार जन्मापासूनच जरी होत असले तरी खरा संगीतप्रवास वयाच्या सहाव्या वर्षापासून सुरु झाला. सहाव्या वर्षापासून पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे पठडीबाज तालमीला सुरुवात झाली. सुरुवातीला सगळ्या मुलांना […]
योगिनी जोगळेकर यांनी बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर १९४८ ते १९५३ या काळात त्यांनी शिक्षिका म्हणून नोकरी केली. त्यांचा जन्म ६ ऑगस्ट १९२५ रोजी पुणे येथे झाला. तसेच ‘राष्ट्रसेविका समिती’च्या माध्यामातून त्यांनी अनेक वर्ष सामाजिक कार्यही केले. याच काळात त्यांनी विविध कथा, कादंबरीतून स्त्रीविषयक लेखन केले. त्यांचे काही काव्यसंग्रह व नाटकेही प्रसिद्ध झाली. पंडित भास्करबुवा बखले यांच्या जीवनावर “” […]
सुहास भालेकरांनी कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सुहास भालेकर यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. त्यांनी सुरुवातीस साबाजी या नावाने लोकनाट्यांतून कामे केली. १९६०-७६ या कालखंडात शाहीर साबळे आणि पार्टीच्या अनेक लोकनाट्यांमधून भालेकर आणि राजा मयेकर या अभिनेत्यांची जोडगोळी गाजली . शाहीर साबळे आणि पार्टीच्या अनेक लोकनाट्यांचे दिग्दर्शन त्यांनी केले . मा.सुहास भालेकर यांनी सहा […]
चाहत्यांतर्फे किंग खान ही उपाधी मिळालेला शाहरूख खान दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा विशिष्ट काळ गाजवणारा अभिनेता म्हणूनही ओळखला जातो. त्याचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ रोजी झाला. वीसेक वर्षांपूर्वी “फौजी’ नावाची मालिका दूरदर्शनवरून प्रसारित व्हायची. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेतील नायकाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळविले. रुपेरी पडद्याच्या दिशेने टाकलेले शाहरुख खानचे ते पहिले पाऊल होते. […]
अमिताभ बच्चन यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करीत असत. अमिताभ बच्चन यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९४२ रोजी झाला.चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनी हे टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली आणि पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले. प्रसिद्ध हिंदी साहित्यिक सुमित्रानंदन पंत यांनी बच्चन कुटुंबातल्या या बाळाचं ‘अमिताभ’ या […]