नवीन लेखन...

याला जीवन ऐसे नाव भाग ९

तहान तर लागली आहे आणि अनावश्यक पाणी प्यायचे पण नाहीये, अशा वेळी काय करावे? साधे उदाहरण घेऊ. दुपारच्या वेळी भर उन्हात बाजारात गेलाय, आजच्या भाषेत शाॅपिंगला ! प्रचंड तहान लागली आहे. आणि तुम्हाला थंडगार पाणी ऑफर केले, तर एक ग्लास थंडगार पाणी अगदी एका दमात पिऊ शकाल. पण तहान भागली, असं वाटणार नाही. पाणी साधे असेल […]

याला जीवन ऐसे नाव भाग ८

संदर्भ – वाग्भट तृष्णा चिकित्सा अध्याय तहान हा जेव्हा रोग होतो, तेव्हा हा रोग कमी होण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. ही तहान पण तीन प्रकारची लागते. वाताची, पित्ताची, आणि कफाची. त्यातील सूक्ष्म फरक वैद्यांच्या लक्षात येतो. यासाठी वैद्यांच्या अनुभवाचा आणि ग्रंथोक्त ज्ञानाचा फायदा घ्यावा. पण सर्वसाधारणपणे पाणी पिऊनदेखील जर तहान शमली नाही तर काय करावे, ते उपाय […]

याला जीवन ऐसे नाव भाग 7

1अपानवायु आणि ढेकर, 2मल, 3मूत्र, 4शिंक, 5तहान, 6भूक, 7खोकला, 8जांभई, 9उलटी, 10अश्रू, 11शुक्र, 12झोप आणि 13श्रमामुळे लागणारा दम, यांना वेग असे म्हटलेले आहे. यातील कोणाचेही अवरोध करू नये, किंवा मुद्दाम प्रवर्तन करू नये.म्हणजे निर्माण करू नये. या प्रत्येक रोगाचा अवरोध केल्यामुळे काय काय लक्षणे दिसतात, ते वाग्भट या शास्त्रकारांनी अध्याय चार मध्ये वर्णन केले आहे. या […]

याला जीवन ऐसे नाव भाग ६

वेगान् न धारयेत न प्रवृत्तयेत वेगांचे धारण करू नये अगर मुद्दाम प्रवर्तन करू नये. म्हणजे शास्त्रकार असे सांगतात की, शरीराकडून आतून जे सांगितले जाईल तेवढे त्या वेळी करावेच. आणि जर केले नाही तर त्रास होणार हे शंभर टक्के सत्य आहे. तहान, भूक, उलटी, संडास, लघवी इ. असे एकुण तेरा वेग आहेत, ज्यामधे त्याला विसरून चालत नाही. […]

याला जीवन ऐसे नाव भाग ५

गंगोत्री,यमनोत्री हरिद्वारचे पाणी वेगळे, नाशिक सातारा पुण्याचे वेगळे, बार्शी सोलापूर यवतमाळचे वेगळे आणि कोकणाले वेगळे! म्हणजे पचायला कमी जास्त वेळ घेणारे ! केमिकली एचटुओ. पण फिजिकली त्यात एच आणि ओ बरोबर आणखी कितीतरी रसायने पिण्याच्या पाण्यात देखील आढळतात. कोकणातले पाणी तर सर्वात प्रदूषित. वरून येणारी सर्व केमिकल, शिवाय समुद्रातून भरतीच्या वेळी नदीमधे मागे फिरणारे पाणी जमिनीमध्ये […]

याला जीवन ऐसे नाव भाग ४

आपले शरीर सत्तर टक्के पाण्याने भरलेले आहे. बाहेरील उष्णतेमुळे अंगातील पाण्याची पण वाफ होत असते. घाम येत असतो. पाणी कमी होत असते. पाणी कमी झाले तर नाजूक अवयवांना त्रास होतो, म्हणून पाणी भरपूर प्यावे असे आजकाल डाॅक्टरमंडळींकडून सांगितले जाते. बरोबर आहे, काही चूक नाही. पाण्याला जीवनच म्हटले आहे. पण अति तिथे माती हे पण विसरून चालणार […]

याला जीवन ऐसे नाव भाग ३

निसर्गातील प्रत्येक क्रियेचा कर्ता तो परमात्मा आहे. तसेच शरीराच्या प्रत्येक क्रियेचा नियंता, प्रणेता, भोक्ता तो आत्मा आहे. आत्मा हे परमात्म्याचेच एक छोटे रूप. एक रिमोट तर दुसरा सेन्सर. हे एकमेकांच्या सान्निध्यात, समोरसमोर असले तरच चॅनेल बदलणार. संवाद जुळणार. माझ्या शरीरात मला काय हवंय, काय नकोय याचा निर्णय तो घेतो. मन त्याची इच्छा ज्ञानेंद्रियाकडून विचारून घेतं आणि […]

याला जीवन ऐसे नाव भाग २

आरोग्याच्या बाबतीत अमुक एक नियम करून चालत नाही. मागे अनेक वेळा सांगितल्या प्रमाणे देश, प्रकृती, सवय, मनाची अवस्था, आवडनिवड, उपलब्धता इ. अनेक गोष्टींवर आरोग्याचे मापदंड बदलत असतात. प्रत्येकाला एकाच तराजूत तोलता येणारे नसते. एखाद्याच्या प्रकृतीतला नेमकेपणा, आवश्यकता, गरज, योग्य पथ्यापथ्य हा जाणकार वैद्यच सांगू शकतो. त्याहीपेक्षा अचूकपणे फॅमिली डाॅक्टर / वैद्य सांगू शकेल. कारण त्या वैद्याला […]

याला जीवन ऐसे नाव भाग १

जीवन म्हणजे पाणी. आजपासून पाण्यावर चर्चा सुरू करू. कारण पाणी कसे प्यावे, किती प्यावे, यामधे बरीच मतमतांतरे आढळतात. ग्रंथामधे जे संदर्भ आले आहेत, त्या अनुषंगानेच माहिती पुरवली जाईल. जे व्यवहारात दिसते आणि ग्रंथात आहे, त्यानाच आपण आधार मानूया. ग्रंथ कोणते ? आयुर्वेदाचे सर्वाना सहज समजतील, असे ग्रंथ म्हणजे अष्टांग संग्रह आणि अष्टांग ह्रदय. म्हणून आपण हे […]

आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७५

विरूद्ध आहार ही संकल्पना फक्त आयुर्वेदात सांगितलेली आहे असे मला वाटते. दोन विरूद्ध गुणाचे पदार्थ एकत्र करून खाऊ नयेत. म्हणजे दूध आणि फळे, दूध आणि मासे, दूध आणि मीठ इ.इ. आता हे बहुतेक सर्वांना माहिती आहे. पण गाडी योग्य मार्गावर वळत नाही. हाच बदललेला आहार. चहातून चपाती खाणे, केळ्याची शिकरण खाणे, माश्यांचे जेवण झाले असले तरी […]

1 34 35 36 37 38 53
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..