नवीन लेखन...

डॉ. भगवान नागापूरकरांचे जीवनातील विविध अनुभव सांगणारे हे सदर.

मच्छरांचे साम्राज्य 

जगावर राज्य कुणाचे ?  जो तो आपणच श्रेष्ठ असून आपलीच जगावर सत्ता चालते. ह्या एका विचारांत, अर्थात भ्रमात असतो. परंतु कित्तेक प्रसंग वा घटना अशा घडतात की त्यावेळी सर्व समुदाय हतबल झालेला जाणवतो. तेव्हांच प्रश्न पडतो की येथे राज्य कुणाचे  ? […]

वेळ – ( TIME )

वेळेच्या चक्राचा विचार करता कळते, की वेळ ही तीन भागांत वाटली गेली आहे. भविष्य भूत आणि वर्तमान ह्या संकल्पनात. भविष्य हा येणारा काळ. तो अनिश्चीत असतो. म्हणून असत्यात जमा होतो. भूतकाळ हा गेलेला, आता हाती न लागणारा. म्हणून अनिश्चीत होय. त्यालाही असत्य समजले गेले. वर्तमान काळ फक्त निश्चीत, अस्तित्वाची जाणीव देणारा, म्हणून सत्य समजला जातो. […]

एक अफलातून व्यासंग 

…. मी भारावून गेलो. दैनंदिनीच्या धावपळीत आणि कार्यबाहुल्यांत मग्न राहून, सारे लक्ष्य व्यवहारी जीवनांत गुंतून राहीलेले जाणवले. जीवनाचे सत्य, अंतिम ध्येय हे कशासाठी करावयाचे याचा विसर पडत असल्याचे त्या क्षणाला वाटले. ह्रदय भरुन आले. […]

मला समजलेले परमेश्वराचे स्वरूप

परमेश्वराचे स्वरूप कसे असेल, त्याचा शोध आणि बोध ह्या विश्वात मानव अर्थात तथाकथीत बुध्दीवान प्राण्याचे अस्तित्व आले आणि तेव्हा पासून चालू आहे. अनेक तर्कवितर्क, धार्मिक मतमतांतरे निर्माण झाली. प्रत्येक विचारधारा आपापल्याशी वर्णन करत आहे.  […]

अन्नासाठी दाही दिशा

कोपऱ्यात गुळाचा खडा ठेवा, थोड्याच वेळांत अनेक मुंगळे वेगवेगळ्या दिशेने त्या गुळाच्या खड्याभोवती जमतात. मधाचा एक थेंब वेगळाच गंध पसरवितो. ज्यामुळे अनेक माश्या उडत त्याच्या जवळ जमा होतात. कोठेतरी पडलेल्या मृत प्राण्या भवती असंख्य किडे आळ्या अशाच पद्धतीने जमा होतात. ते त्यांचे भक्ष असते. […]

भाकरीसाठी मिळाला मार्ग

रेल्वे स्टेशनलगतच्या पाऊल वाटेवरुन जात होतो. एका वयस्कर माणसाने माझे लक्ष्य वेधून घेतले. त्याच्या हातात मोठी प्लास्टीकची थैली होती. तो रेल्वेच्या मार्गावर पडलेल्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या वेचून, त्या थैलीमध्ये जमा करीत होता.माझी ऊत्सुकता जागी झाली. त्या माणसाला थांबवून मी चौकशी केली. अनेक प्रवाशी आजकाल पाण्याच्या बाटल्या खरेदी करतात. रिकाम्या झालेल्या बाटल्या चक्क रेल्वे मार्गावर फेकून देतात. […]

निर्णय

अशांत, तरीही एका वेगळ्याच समाधानांत मी निघालो. दोन्हीही वेळचे माझे निर्णय मला समाधान देऊ बघत होते. मनाची चलबिचल वेग धरु लागली. माझा निर्णय सामाजिक चौकटीवर आधारलेला होता. जो की मानव निर्मित  होता. परंतु त्याच वेळेला निसर्गाला कांही वेगळच अपेक्षित होत. […]

व्यस्त राहण्याचा मार्ग

नामस्मरण, ईश्वरी चिंतन, ध्यान धारणा, चांगले वाचन, लेखन, अहार, निद्रा (विश्रांति ), आणि बौद्धिक चर्चा, व्यायाम ह्य़ा अपेक्षित कार्यक्रमा शिवाय एखादा छंद जोपावा. जो मनास आनंद, समाधान, व शांतता देणारा असेल. त्यांत कोणतेही ध्येय वा फलाशा नसावी. मराठी ब्लॉग, त्यावरचे लिखाण, चर्चा, आणि रसगृहण हे मजसाठी असेच असणार नाही कां ? तो फक्त व्यस्त राहण्याचा मार्ग असावा.   […]

व्यस्त राहण्याचा मार्ग

सत्तरीच्या पुढे गेलेल्या वयांत संगणकावर ब्लॉग काढणे, लिखाण करणे, त्यासाठी वाचन करणे,  हे सारे सर्व साधारण अपेक्षित नसले तरी ते गैर वाटत नव्हते. येथे कोणतीही गोष्ट, वा यश मिळवण्याची धडपड नव्हती, अपेक्षा नव्हती. आगदी फळाची इच्छा न बाळगता केले जाणारे काम. ह्य़ात मला मिळणार होता फक्त एक आनंद, समाधान आणि व्यस्त राहण्याची कला वा सवय. […]

दुर्वांच्या जुड्या

एका छोट्याशा प्रसंगातून, एक रोमांचकारी भावनिक आणि जीवनाच्या महान तत्वज्ञानाचे विवरण मी त्या गृहस्थाकडून ऐकत होतो. त्यानी जे सांगीतले, त्यानी मी भारावून गेलो. जीवन म्हणजे काय ? जगायचे कसे व कां हे त्यानी जाणले असावे, हे मला उमगले. मी उठून त्याना अभिवादन केले. […]

1 2 3 4 25
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..