नवीन लेखन...

वातानुकूलीत उपनगरीय ट्रेन मुंबईत !

Airconditioned Local rains in Mumbai

बर्‍याच व्यक्ती उराशी काही धैय्य बाळगून असतात व त पुर्ण होण्यासाठी संकल्प करीत असतात. असे बरेच संकल्प आपल्या देशात केंद्र राज्य जिल्हा तालूका व ग्रामपंचायत स्थरावर प्रत्यक्षात येण्यासाठी सोडले जातात. असाच संकल्प रेल्वे मंत्रीमहोदयांनी सोडला असेल जो खर्‍या ‘अर्था‘ चा रेल्वेअर्थसंकल्प असेल आणि कदाचीत हे पत्र पसिद्ध होण्याआगोदर प्रसिद्ध झालाही असेल. सर्व मुंबईकरांच्या रेल्वे अर्थसंकल्पाकडून काही अपेक्षा आहेत त्या पूढीलप्रमाणे :

आहे ते गाड निट हाका म्हणजे झालं ! असे म्हणण्याची पाळी येते. रोजच्या धकाधकी व पळापळीच्या जीवनाला मुंबईकर कंटाळला आहे. ठाणे रेल्वे स्थानकात ट्रेनचे डबे घसरण्याची घटना ताजी आहे तोच कर्जतला जाणार्‍या लोकलचा डबा स्टेशन जवळ घसरला. सध्या रेल्वेचे डबे घसरण्याच्या घटना वारंवार होताना दिसतात. प्रत्येक ऋतूत रेल्वेगाडयांचे वेळापत्रक कोलमडण्याचे कारण वेगवेगळे असते. कधी सिग्नल फेल्युअर तर कधी ओव्हरहेड वायर तुटली तर कधी गाडी रूळावरून घसरली एखादी व्यक्ती ट्रेनखाली आली आणि या व्यतिरिक्त रोज नवीन नवीन कारणे आहेत ती वेगळीच. त्यात मोटरमनचे गोस्लो तर कधी गार्ड कर्मचारी व कामगारांचा संप. संप तर कधी संपतच नाहीत. याला केंद्र व राज्यसरकारी निमसरकारी कंपन्या बँका व इतर खाजगी अस्थापने अपवाद नाहीत. अश्याने देशाची प्रगती कशी होणार?

“वातानुकूलीत उपनगरीय ट्रेन मुंबईत” अशी बातमी काही महिन्यांपूर्वी वृत्तपत्रात वाचण्यात आली. जर का वातानुकूलीत उपनगरीय ट्रेन मुंर्बत धावणारच आहे तर काही अपेक्षीत बदल सुचवावेसे वाटतात ज्याने समस्त मुंबईकारांचे ट्रेन प्रवासातील हाल कमी होण्यास मदत होईल. गाडीतील गर्दी कमी करण्यासाठी डबल डेकर ऐसी ट्रेन सुरू कराव्यात ज्याला १५ डाबे असतील. नाहीतरी सगळया लोकलगाडया १५ डब्यांच्या होणा आहेत. डब्यात टॉयलेट फेरिवाले व भिकार्‍यांना गाडीत चढण्यास मनाई गुटखा व पानतंबाखूचे पिचकार्‍या मारणार्‍या व्यक्तींना जबर दंड. खाण्याचे पदार्थ खाल्ल्यावर होणारा कचरा रिकाम्या पिशव्या कागद व फळांची साले वगैरे टाकण्यासाठी कचरा कुंडया. प्रत्येक स्टेशन येण्याआगोदर आत्ता पेक्षा जास्त सुस्पष्ट उद्घोषणा आणि मुख्य म्हणजे सुरक्षेसाठी कमांडोज् असावेत.

रेल्वे प्रवाशांना असा बदल नक्कीच स्वागतार्ह वाटेल. रोजच्या वापरातील लोकोपयोगी वाहाने आपल्या सर्वांसाठी आहेत त्याची निट काळजी घेणे त्यामध्ये कचरा नकरणे हे आपले आद्य कर्तव्य आहे हे कोणाच्याही ध्यानी नसते. परंतू सध्याची रेल्वेची हालत बघता हे आपण कसे पचवणार आहोत हा प्रश्न पडतो. रेल्वे अर्थसंकल्पात कदाचीत उपनगरीय रेल्वे भाडेवाढ झाली नसेल परंतू मुंबईतील वाढत्या लोकसंख्येचा लाईफलाईनवर पडलेला अतिरीक्त ताण ज्याने प्रवाशांचे रोजचे हाल डब्यातील गर्दी व असुरक्षीत प्रवास स्थानकांची मुख्यत्वे प्रसाधन गृहे व वेटींगरूमची अस्वच्छता याकडे अग्रक्रमाने लक्ष दिले गेले पाहिजे. यात लांबपल्यांच्या गाडयांचाही समावेश आहे.

वातानुकूलीत रेल्वे प्रकल्पाचा नियोजीत मार्ग पूर्ण करण्यास एलिव्हेटेड तर काही ठिकाणी फ्लाय ओव्हर तर अन्य ठिकाणी जमिनीत टनेल खोदून मार्ग पूर्ण करण्यात येणार असल्याचे कळते. अभ्यासासाठी कंपनीला ८ कोटी रूपये व प्रकल्प पूर्ण करण्यास अंदाजे खर्च १० हजार कोटी रूपये येणार आहे. आपापले ऊखळ पांढरे करून घेण्याच्या स्पर्धेत कोण व किती यशस्वी होतो यावर प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे. यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होणे जरा कठिणच वाटते या सर्वांच्या परिणामाने प्रकल्पाचा अंदाजे खर्च कितीतरी अधिक पटीत वाढण्याची शक्यता आहे. याकाळात कित्येक केंद्र व राज्य सरकारे बदलतील प्रत्येकाचे ह तसंबंध पार्टी पार्टीत नावासाठी भांडणं ज्या पार्टीची सत्ता असताना प्रकल्प पूर्ण झाल्यास संपूर्ण श्रेय लाटायचे असते ते वेगळेच. वरील सर्व प्रश्न कोणालाही न दुखवता कसे सोडवता येतील याचा विचार नक्कीच रेल्वे अर्थसंकल्पात असेल असे वाटते. असो.

समस्त मुंबईकरांच्या वरील अपेक्षा येणार्‍या रेल्वे अर्थसंकल्पात पूर्ण होवोत आणि उपनगरीय रेल्वे प्रवास कमी गर्दीचा अल्हाददायक थंडगार सुरक्षित व सुखकर होवो हिच परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना व सदिच्छा !

— जगदीश पटवर्धन
बोरिवली (प.)

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..