नवीन लेखन...

अभिनेत्री वर्षा उसगावकर

वर्षा उसगावकर ह्या मूळच्या गोव्याच्या. त्यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९६८ रोजी झाला. त्यांचा पहिला चित्रपट होता “गंमत -जंमत’. सचिनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड आणला आणि वर्षा उसगावकर ही नवी अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला दिली. “गंमत जंमत’ नंतर तिने “खट्याळ सून नाठाळ सासू’ “तुझ्याविना करमेना’, “हमाल दे धमाल’, “मुंबई ते मॉरिशस’, “लपंडाव’ यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले. या सगळ्यामध्ये त्यांचा संजय सूरकर दिग्दर्शित “यज्ञ’ हा चित्रपट आला, या काळातच त्यांच्याकडे हिंदी चित्रपटांची सुरवात झाली. जॅकी श्रॉफबरोबर त्यांनी “दूध का कर्ज’ हा चित्रपट केला. ९० च्या दशकात दूरदर्शन हेच एक प्रभावी माध्यम होते. त्यात “महाभारत’ या लोकप्रिय मालिकेत उत्तराच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. बी. आर. चोप्रा यांची निर्मिती असलेल्या या मालिकेतील उत्तराच्या भूमिकेने वर्षाच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. देशभर तिची ओळख निर्माण झाली. जब्बार पटेल दिग्दर्शित “एक होता विदूषक’सारख्या आशयघन चित्रपटातून, तसेच सचिन दिग्दर्शित “आत्मविश्वाणस’ चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकेत त्यांचे अस्तित्व ठळकपणे जाणवते. त्यांचे “ब्रह्मचारी’ हे नाटक गाजले आहे. नाट्यशास्त्राचे रीतसर दोन वर्षे औरंगाबादला लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे शिक्षण घेतलेल्या वर्षा उजगावकर ग्लॅमर आणि अभिनय यांचा नेमका समन्वय साधणारी अशी स्टार अभिनेत्री आहेत. ‘वक्त’, ‘चौदहवी का चांद’ या सारख्या क्लासिक चित्रपटांचे संगीतकार मा.रवी यांच्या वर्षा उसगावकर या सुनबाई आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4226 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..