त्या सांज सावल्या किरण सोनेरी
एकांत मनास जाईल मोहवूनी
कितीक आठवणींचा पसारा पसरुनी
हरवल्या वाटा माखून धूळ वारा धुसरल्या सांजवेळी
किरणांच्या रांगोळीचा आकाशी सजला सोहळा
तो रवी अस्त आज अवचित झाकोळला
निमिष क्षणभर थांबले मेघ भरलेले
डोळ्यांत अलगद पाणी ओथंबलेले
वळचणीस सांधले कुड कौलारु काही
कवडसे प्रकाशले गर्त भाव वेळी
पागोळीत थेंब पाण्याचे साचले काही
उमळल्या आठवणी मनात काहूर दाटी
जीव जिव्हात जिव्हारी लागला
भाव व्याकुळ घन भरल्या मेघ धारा
मेघांच्या रिक्त धारेत थेंब एक हरवला
त्या क्षणी आठवणी स्तब्ध आल्हाद झाल्या
वाटा काटेरी बोचल्या वाटेवरती
अलगद पाऊल चालता काही
गेले गोत आप्त लांब हरवुनी
रंगले पान परी ओठ शुष्क ओल वेळी
काव्यांत गूढ अनामिक व्यक्तता दाटली
आठवणींच्या झुल्यावर एक रेघ उमटली
निःश्वास सुटले परतून जखमा डोही
या मनाचे त्या मनाशी गूज साधूंनी
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply