नवीन लेखन...

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग १५

कधी संपणार हे मांसपुराण असे वाटत असेल ना ? पण काय करणार ? आहार हेच औषध असल्याने दुसऱ्या कोणत्याही औषधाशिवाय जगायचे असेल तर मूळ कारण नष्ट व्हायला नको का ? निदान त्याच्यापर्यंत पोचले तर पाहिजे.

भारतातल्या मानसिकतेचा आणि गरजांचा विचार करणारे पुणे येथील सुप्रसिद्ध डाॅक्टर कल्याण गंगवाल यांचे नाव घेतल्याशिवाय रहावत नाही. शाकाहारच का ? या त्यांनी लिहिलेल्या आणि राजहंस पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकामधे विस्ताराने माहिती आहे. डाॅ. श्रीराम गीत हे त्याचे सहलेखक आहेत.

त्यांनी फारच सुंदर अभ्यास करून आपले विवेचन दिलेले आहे.

एखाद्या देशात उपलब्ध असलेली साधनसामुग्री ही प्रत्येक देशाचे बलस्थान असते. अमेरीका, डेन्मार्क न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया इंग्लंड या देशातील लोकसंख्या आणि देशाचा भौगोलिक विस्तार, आर्थिक सुबत्ता यांचा विचार केला तर त्यांना मांसाहार करण्यासाठी लागणारी प्राथमीक पशुंची पैदास आणि पोषण सहज उपलब्ध होते. परवडते. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होणारच नाही कारण तेथील अत्यंत प्रतिकुल हवामान. तिथे तयार होणारी मका गहू ही मुख्य पिके प्रामुख्याने पशुपालनासाठीच घेतली जातात. देशात उपलब्ध पाण्याचा साठ्यापैकी निम्मा खर्च पशुपालनावर आणि कत्तलखान्यावर होतो.

तसा खर्च करणे भारताला शक्य नाहीये. भारतातील मांसाहार करणाऱ्या सर्व लोकांनी ठरवले तरी ते या प्रगत देशातील लोकांच्या बरोबरीने मांस खाण्यात कधीही तुलना करू शकत नाही.

अमेरिकन माणूस दररोज मांसाहार करतो. याउलट भारतीय माणसे आठवड्यातून दोन वेळाच मांसाहार करतात. इतर वेळा भारतीय शाकाहाराचाच विचार करतो.

आर्थिक गणित पाहिले तरी प्रमाण व्यस्तच आहे. आठवड्यातून दोन वेळा जरी मांसाहार केला तरी देखील दरमहा सात ते साडे सात हजार रूपये खर्च येतो. एवढा खर्च केवळ मांसाहारावर करू शकणारी किती कुटुंब भारतात आहेत ? दारीद्रय रेषेखालील लोकसंख्या आणि तिचे दरमाणशी उत्पन्न पाहिले तर मांसाहार करणे अशक्यप्राय वाटते.

या सर्व गोष्टींचा विचार करता भारतात
शाकाहार करणे व सोयीचे झालेले आहे.
भारतातील शेतजमिनीची कमतरता, त्यावर होणारे शाकाहारी प्राणी आणि माणसाचे पोषण, त्यावर अवलंबून असलेल्या मांसाहारी प्राण्यांची गरज हे सर्व व्यस्त प्रमाणात आहे.

परंपरा, गरज, उपलब्ध पशुधन, शेतीप्राधान्य आणि आर्थिक कुवत यांचा विचार करता, शाकाहारी बनणे आवश्यक वाटते.

म्हणून जगा आणि जगू द्या, ही विचारसरणी असणाऱ्या भारतात प्रार्थना म्हटली जाते,
सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
15.10.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..