नवीन लेखन...

थकवा.. अंगदुखी.. निरुत्साह

मित्रांनो सध्याचे युग धावपळीचे आहे.प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्याची ,गाठण्याची ,पूर्ण करण्याची प्रत्येकाला घाई असते.

जीवन धकाधकीचे बनले आहे आणि मुंबईच्या लोकलने प्रवास करणार्याला तर अक्षरशः ह्याचा प्रत्यय रोजच येत असतो.

तर असे दिवसभर काम करून आपल्यापैकी प्रत्येक जणथकून जातो,दमून जातो. अंग आंबल्यासारखे होते,दुखायला लागते.कोणताही उत्साह राहत नाही.

नको ते काम ,नको ती नोकरी असे सुद्धा वाटू लागते,पण नाईलाजाने दुसर्या दिवशी पुन्हा नेहमीचे रहाटगाडे ओढणे भागच असते.

तरुणाईच्या जोश मध्ये कितीही काम ,मेहनत केली तरी थकवा येत नसे पण आता जरा वय वाढू लागले की थकवा आणि अंगदुखी आपले अस्तित्व दाखवू लागतात.

अश्या लवकर थकनाऱ्या ,अंग दुखणाऱ्या लोकांसाठी होमिओपथी मध्ये रामबाण औषध आहे.
भले मग तो थकवा शारीरिक असो,मानसिक असो वा इतर कोणताही असो ह्या थकव्यावर, अंगदुखीवर, निरुत्साहावर मात करण्यासाठी औषध आहे Arnica 30

होमिओपथी मेडिकल स्टोर मधून हे औषध liquid मध्ये घ्या. एक 500ml म्हणजे अर्धा लिटर ची बाटली घ्या. ह्या बाटलीत उकळून गार केलेले पाणी भरा व ह्या पाण्यात Arnica 30 चे फक्त 3 थेंब टाका.
बाटलीचे झाकण लावून बाटली जोरजोरात हलवा.

झाले,अंगदुखी ,थकवा ह्यावर मात करणारे औषध तयार झाले. ह्या बाटलीच्या झाकणानेच दोन दोन झाकण पाणी दिवसातून दोन वेळा घ्या. सकाळी अनशापोटी म्हणजे चहा,नाश्ता करण्याच्या 10 मिनिटे आधी आणि रात्री झोपण्यापूर्वी असे घ्या.

तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या पाण्याच्या दोन डोस मधेच तुमची अंगदुखी थकवा कोठच्या कुठे पळून जाईल. अंगात नवीन स्फूर्ती,नवा जोश,नवी ताकद येईल. मनात नवीन उत्साह जागेत आणि तुम्ही जग जिंकण्यासाठी सज्ज व्हाल.

थोडी अतिशयोक्ती जरी वाटली तरी हे अगदी खरे आहे. वय झालेल्या आणि वय होत चाललेल्या लोकांसाठी हे औषध खरेच वरदान आहे.

आणि अर्थातच होमिओपथी असल्याने जरा सुद्धा side effect नसल्याने तुम्ही बिनधास्तपणे हे औषध घेऊ शकता.

मग मित्रानो आजच हे औषध सुरु करा आणि आठवडाभरातच तुमचे आभार मानणारे मेसेज माझ्या व्हाट्स अप नंबर वर येतील ह्याची मला खात्री आहे

— डॉ प्रसाद हजारे,भिवंडी
09881374994

— `आरोग्यदूत’ WhatsApp ग्रुपवरुन

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 116 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..