१. नैसर्गिक पद्धतीनं शेती केलेलं अन्न खाणं चांगलं. म्हणजेच ऑरगॅनिक फूड. त्यात रसायनं असण्याची शक्यता नसते. त्यामुळे ज्या-ज्या वेळी शक्य असेल त्यावेळी ऑरगॅनिक फूड घ्या.
२. साखर कमीत कमी वापरावी किंवा बंदच करावी. थोडी तरी साखर शरीराला हवी, हा गैरसमज आहे; कारण नैसर्गिक साखर आपल्याला गहू, भात, फळं यातही मिळत असतेच. साखरेऐवजी गोडीसाठी शुद्ध मध किंवा ‘केमिकल फ्री’ गूळ वापरावा.
३. तेल-रासायनिक प्रक्रिया करून शुद्ध केलेलं तेल वापरण्यापेक्षा मशिनच्या माध्यमातून शुद्ध केलेलं तेल वापरावं. गाळलेलं किंवा घाण्यावरचं तेल वापरलं तर उत्तम.
४. कमीत कमी प्रक्रिया केलेले पदार्थ वापरा. उदाहरणार्थ, सफरचंद नुसतं खाणं उत्तम, त्याचा रसही ठीक; पण त्याचा जाम मात्र भरपूर प्रक्रिया केलेला, निःसत्त्व आणि साखरेमुळे खूप जास्त कॅलरीजचा असतो. म्हणूनच पदार्थ जास्तीतजास्त त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात खावं. बाहेर स्ट्रॉबेरी, मँगो असे ड्रिंक्स किंवा आईस्क्रीम मिळतात; परंतु त्यात केवळ कृत्रिम स्वाद वापरलेला असतो
५. भाज्या ताज्या आणि त्या त्या मोसमात खालेल्या जास्त चांगल्या; कारण त्यावेळी त्यांच्यात जीवनसत्त्वं आणि क्षार जास्तीत जास्त असतात. साठवलेल्या, पावडर केलेल्या, फ्रोझेन भाज्यांमध्ये नैसर्गिक सत्त्वं कमी आणि रसायनं अधिक असू शकतात. भाज्यांच्या सूप पावडरचं पाकीट वाचल्यावर त्यात किती अनैसर्गिक गोष्टी आहेत, ते आपल्याला कळेल.
६. घरचं अन्न घेणं कधीही चांगलं. हॉटेलमधील भाज्या छान दिसण्यासाठी त्यात रंग वापरले जातात.
७. मिठाई वरचा वर्ख आणि त्यातील कृत्रिम रंगही शरीराला हानिकारक ठरतात. असेच रंग केक, पेस्ट्रीज, बर्फाचा गोळा, गोळ्या यातही वापरले जातात म्हणून यांचा वापर कमीत कमी करण्यावर भर द्यावा. घरी केलेला नाचणी केक वगैरे उत्तम.
८. मासे किंवा फिश यात ओमेगा फॅट्स असतात. आकारानं मोठ्या माशांमध्ये मर्क्युरीचं प्रमाण जास्त असतं. यासाठी आकारानं लहान मासे घ्यावेत.
गजानन वैद
whats app -7775871809
(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)
Leave a Reply