नवीन लेखन...

न्याय मिळवावा लागतो!

प्रकाशन दिनांक :- 22/08/2004

‘आपल्या कुटुंबीयांना उघड्यावर टाकणारा आत्महत्येसारखा मार्ग निवडणे म्हणजे पळपुटेपणा होय. त्याला पुरुषार्थ म्हणत नाही. शेतकऱ्यांनी तो मार्ग न निवडता, जिद्दीने संकटावर मात करावी.
[…]

नव्या युगाचा नवा मंत्र!

प्रकाशन दिनांक :- 08/08/2004
विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणूनच प्रवाहीपणा हे तिचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. खळाळत वाहणारी नदी स्वत:सोबत वाटेत येणाऱ्या सगळ्यांनाच वाहत नेत असते; परंतु एखादा मोठा खडक तिच्या प्रवाहाला दाद न देता अविचल उभा राहतो. अशावेळी त्या खडकावर डोके आपटीत आपला प्रवाह अवरुद्ध करणे नदीला मान्य नसते.
[…]

चौकशा नव्हे उपाययोजना करा!

ऐतिहासिक रोम शहर जळत होते, तेव्हा सम्राट नीरो शांतपणे बासरी वाजवित होता म्हणे! घटना ऐतिहासिक आणि सत्य असली तरी ती एकदाच घडून गेली असे नाही. विध्वंसाकडे अलिप्त नजरेने पाहत आपल्याच मस्तीत जगणारा नीरो त्यानंतर पुन्हा-पुन्हा जन्माला आला आणि येत आहे. […]

पाझर फुटलाच नाही!

प्रकाशन दिनांक :- 25/07/2004
‘राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा’, सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या महाराष्ट्र भूमीचे हे वर्णन शब्दश: खरे ठरु पाहत आहे. निसर्गाची अवकृपा आणि शासन-प्रशासनाची बेफिकरी अशीच सुरु राहिली तर महाराष्ट्र देश निकट भविष्यातच केवळ दगडांची भूमी म्हणून ओळखल्या जाऊ लागला तर नवल नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने महाराष्ट्राला बसत आहे आणि त्यातही विदर्भ-मराठवाडा या भागाला तर निसर्गासोबतच शासनाच्या बेमुर्वतपणाचाही सामना करावा लागत आहे.
[…]

व्यवस्थेचे बळी!

प्रकाशन दिनांक :- 11/07/2004

अलीकडील काळात आत्महत्यांचे प्रमाण अतिशय वाढत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी, विद्यार्थी, पोलिसासारख्या सरकारी विभागातील कर्मचारी आणि लहान-मोठे उद्योजकदेखील आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग चोखाळत आहेत. या घटना समाजाच्या सुदृढतेचे लक्षण आहेत, असे खचितच म्हणता येणार नाही.
[…]

अस्तनीतील निखारे!

लाखोळी डाळीच्या विक्रीवर गेल्या 43 वर्षांपासून असलेली बंदी अखेर राज्य सरकारने संपुष्टात आणली. सरकारच्या या निर्णयाचे कौतुक करावे की तब्बल 43 वर्षे चुकीचा निर्णय कायद्याच्या स्वरूपात लागू करून राबविल्याबद्दल सरकारला जाब विचारावा,असा प्रश्न पडला आहे. सरकार लोकनियुक्त असते.
[…]

प्रवाह बदलण्याची गरज!

एखाद्या गोष्टीचा किंवा घटनेचा अंतिम परिणाम लक्षात येण्यासाठी काही काळ जाऊ देणे क्रमप्राप्त ठरते. साध्या बीजाची सकसतादेखील त्या बीजाचे वृक्षात रुपांतर झाल्यावरच कळते. त्या वृक्षाला लागणाऱ्या फळा- फुलावरुन बीजाची गुणवत्ता सिद्ध होत असते. […]

कचर्‍यातून राष्ट्रनिर्मिती

राखेतून फिनिक्स पक्ष्याचा जन्म होतो, असे म्हणतात. मात्र कचऱ्यातून एखाद्या राष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते किंवा एखाद्या राष्ट्राचा उकीरडाही होऊ शकतो. आज भारतात अशीच परिस्थिती आहे. […]

अपघात! नव्हे, खूनच!

प्रकाशन दिनांक :- 13/06/2004

आपला देश विस्तार, लोकसंख्या आदींच्या बाबतीत जगातील इतर अनेक देशांच्या तुलनेत प्रचंड मोठा आहे. स्वाभाविकच इतर अनेक बाबतीतसुध्दा आपण जगाच्या खूप पुढे आहोत. अर्थात आपण भारतवासी म्हणून अभिमान बाळगावा, अशा बाबी मात्र त्यामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या आहेत; किंबहुना नाहीतच असे म्हटले तरी चालेल.
[…]

महागडा गरीब देश!

प्रकाशन दिनांक :- 30/05/2004
भारताच्या गरिबीचे तुणतुणे आम्ही भारतवासी नेहमीच वाजवतो. इतर पुढारलेल्या देशातसुद्धा भारताच्या गरिबीची नेहमीच कुचेष्टा होते. परंतु गरिबी निश्चित करण्याची जी मानके आहेत त्याचा विचार केला तर भारताची गरिबी वेगळ्या अर्थाने श्रीमंत ठरते.
[…]

1 41 42 43 44 45 51
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..