नवीन लेखन...
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
About वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत. लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात. आहार या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे. त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.
Contact: Website

पुष्करमुल

ह्याचे ०.३३-२ मीटर उंचीचे क्षुप असते.पाने ३-६ सेंमी लांब व २-३ सेंमी रूंदीचे मुलीय पत्र असते.पत्रवृन्त पाना इतकेच लांब असते.काण्डीयपत्र आयताकार असून काण्डास वाढणारे असते.फुल पिवळे ०.५-१ सेंमी व्यासाचे गुच्छ असते.फळ ०.४ सेंमी लांब व चमकदार व स्निग्ध असते.फळाला चिकटलेले बहिर्दल ०.७५सेंमी लांब व तांबुस रंगाचे असते. ह्याचे उपयुक्तांग मुळ असून पुष्करमुल चवीला कडू,तिखट असून उष्ण […]

जटामांसी

जटामांसीचे सरळ वाढणारे ०.५-१ मी उंचीचे बहुवर्षायू क्षुप असते.ह्याचे मुळ १०-१२० सेंमी लांब असून त्यावर जटाकार केस असतात.ह्याची पाने मुलीय व काण्डीय असतात.फुले गुलाबी वा निळ्या रंगाची गुच्छात उगवतात.फळ ०.४ सेंमी लांब असून पांढरी लव असलेले असते.मुळांवरील पाने वाळून पडतात व त्यावर शिल्लक असणारे बळकट,तांबूस तपकिरी रंगाचे केस युक्त गाठी रहातात ज्यांना जटा म्हणतात. जटामांसीचे गुणधर्म […]

हरितकी/हरडा

हा २०-३०मीटर उंच वृक्ष आहे.ह्याची त्वचा गडद तपकिरी रंगाची व खडबडीत असून हिरड्याचे लाकूड अत्यंत कठिण व घट्ट असते.ह्याची पाने ७-२० सेंमी लांब व ५-१० सेंमी रूंद व टोकदार असून पत्र शिरांच्या ६-८जोड्या असतात.फुले २.५-५ सेंमी लांब असून फळ २.५-५ सेंमी लांब व अण्डाकार असते आत कठिण मगज असतो व पृष्ठभागावर पाच पन्हाळी सारख्या उभ्या रेषा […]

वेखंड/वचा

हे पाणथळ जागी उगवणारे व नेहमी हिरवेगार असणारे १-२ मी उंचीचे क्षुप आहे.ह्याचे कंद जमीनीत असतात.आल्याच्या कंदा प्रमाणे ते वाढते.ह्याला ५-६ पर्व असतात जे मधल्या बोटा एवढे जाड व रोमयुक्त तांबूस रंगाचे व सुगंधी असतात.पाने हिरवी चमकदार व उसाच्या पानाप्रमाणे लांब,व कडा लाटा युक्त असतात.फुल पिवळट पांढरे मंजिरीस्वरूप असते. वचा चवीला कडू तिखट असून हि उष्ण […]

उशीर/वाळा

आपण सर्वच जण वाळा ह्या वनस्पतीला ओळखतो.पुर्वीच्या काळी राजे महाराजे ह्यांना वाळ्याच्या पंख्यानी वारा घालत असत. तसेच वाळ्याचे सरबत हे देखील बऱ्याच जणांना आवडते.चला तर आता ह्या वाळ्याची आपण पुर्ण ओळख करून घेऊयात. वाळ्याचे तृणमूल असून काण्ड १-१.५ मी उंच व सुगंधी असते.ह्याची बेटं असतात.ह्याची पाने २५-५० सेंमी लांब व १ सेंमी रूंद असतात.हि सरळ असून […]

शतावरी

शतावरी ह्या वनस्पती बाबत आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहीत असेल.आपण सर्वांना शतावरी कल्प तर माहितच असेल जो बाळंतीणीला हमखास दुधातून दिला जातो.चला तर आज आपण ह्या शतावरीची थोडी जास्त ओळख करून घेऊ. शतावरीचे काटेरी झुपकेदार वेल असतो.ह्याच्या फांद्यावर उभ्या रेषा असतात.काण्ड त्रिकोण,स्निग्ध असते.ह्याचे काटे ०.५-१ सेंमी लांब व खालच्या बाजुस वळलेले काहीसे बाकदार असतात.शतावरीचे काण्ड हे […]

मुस्ता/मुस्तक/नागरमोथा

ह्याचे ०.३३-१ मी उंचीचे तृण जातीचे बहुवर्षायू क्षुप असते.ह्याचे काण्ड पातळ,गडद व हिरव्या रंगाचे असते हे भौमिक काण्डापासून उगवते व वरच्या भागात त्रिकोणी असते.पाने लांब व मुळा सारखी असतात.फुले ५-२० सेंमी लांब असतात.काण्डाचा भौमिकभाग सुत्रवत भौमिक काण्डात रूपांतरीत होऊन त्याला १ सेंमी व्यासाचे बाहेरून काळे व आत धुरकट किंवा पांढऱ्या रंगाचे सुगंधी कंद येतात. ह्याचे उपयुक्तांग […]

अशोक

हा आंब्याच्या सारखा दिसणारा ८-१० मीटर उंच सदा हिरवा राहणारा वृक्ष आहे.ह्याची पाने ८-१६ सेंमी लांब व आंब्याच्या पाना सारखी दिसतात.फुले दाट व गुच्छात येतात.हि सुगंधी व आकर्षक पिवळट तांबड्य् रंगाची असतात.फळ ८-२५ सेंमी लांब व ४ सेंमी रूंद असते शेंगा चपट्या असतात व त्यात ४-८ बिया असतात. ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा,बीज व फुले आहेत.हा चवीला […]

गंभारी/ काश्मरी

ह्याचा २० मीटर उंच वृक्ष असतो,बुंध्याची साल पांढरी व काण्ड त्वचा धुरकट असते.जुनी झाल्यावर साल फिकट रंगीत तुकड्यानी सुटते. पाने १०-२५ सेंमी लांब,८-२० सेंमी रूंद असून पर्ण वृन्त ५-१५ सेंमी लांब असतो.त्याच्या टोकाशी गाठी असतात.त्याची पाने देठा जवळ हृदयाकृती तर शेंड्या जवळ पातळ व टोकदार असतात.फुल तांबूस पिवळे एक फुट लांबीच्या मंजिरी स्वरूपात असते.ती अडुळशाच्या फुलांप्रमाणे […]

यष्टीमधू/ज्येष्ठमध

ह्यालाच बोली भाषेत गोडे काष्ठ असे म्हणतात व बाळ औषधी मध्ये देखील ह्याचा समावेश असतो.ह्याचे १-५ मीटर उंच बहुवर्षायू क्षुप असते.मुळ लांबट व लालसर पिवळे किंवा धुरकट असते.मुळाची साल काढल्यावर पिवळ्या रंगाची व धाग्यांनी युक्त गाभा असतो.मुळ व काण्डापासून शाखा प्रशाखा निघतात.पाने संयुक्त असतात व पर्णदल अंडाकार असतात.पर्ण दलाच्या ४-७ जोड्या असतात.ह्याला गुलाबी किंवा वांगी रंगाची […]

1 2 3 4 5 21
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..