Avatar
About किशोर कुलकर्णी
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

दर्जा

  मी त्यावेळी जपानच्या दौर्‍यावर होतो. भारत आणि जपानच्या सांस्कृतिक विभागांनी एकत्रितपणे त्याचं आयोजन केलं होतं. दहा-पंधरा दिवसांच्या कालावधीत हा देश भौगोलिकदृष्ट्या पाहणं शक्य होतं; पण सांस्कृतिकदृष्ट्या त्याचा परिचय होणं हे कठीण होतं. तरीही प्रयत्न सुरू होता. रोज किमान तीन भेटी असा कार्यक्रम असायचा. त्यातही प्रामुख्यानं संग्रहालये असत. काही भेटी मी भारतात असतानाच निश्चित केलेल्या होत्या […]

माझ्या मनातले…

ही गोष्ट आहे माझ्या मित्राची. पंधरा वर्षे होऊन गेलीत त्या घटनेला. त्या वेळी तो अन् मी एकत्र काम करीत असू. पत्रकार म्हणून त्याला अमेरिकेला भेट देण्याचे आमंत्रण आले. तयारी सुरू झाली. सर्वसाधारण अमेरिकेला जायचे म्हणजे असणारा सर्वांत मोठा अडथळा या भेटीत नव्हता. अमेरिकन सरकारच्याच माहिती खात्याने दिलेले हे निमंत्रण असल्याने व्हिसाचा प्रश्न नव्हता. तयारी झाली. दौरा खूप छान झाला. खूप पाहायला मिळाले. बरेच काही समजावूनही घेता आले. या दौर्‍याच्या अनेक हकिकती आम्ही ऐकत गेलो. आमच्याही ज्ञानात भर पडत गेली. […]

1 6 7 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..