उत्तर पेशवाईत विशेष गाजलेल्या शाहिरांतील सर्वांत जेष्ठ शाहीर. हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे राहणारे. अजूनही संगमनेर येथे दरवर्षी अनंत फंदी व्याख्यानमाला होत असते. अनंत फंदी यांचे आडनाव घोलप. हे यजुर्वेदी कौन्डिण्य गोत्री ब्राह्मण.
यांचे पूर्वजांचा धंदा गोंधळीपणाचा व सराफीचाही होता. अनंत फंदी यांनी लावण्या बर्या च केल्या; त्यांतील कांहीं प्रसिद्ध आहेत. नंतर अनंत फंदी यांनी तमाशा पण केला. त्यांचे तमाशांतील साथी होते, एक मलकफंदी, दुसरे रतनफंदी, तिसरे राघवफंदी आणि चवथे हे अनंतफंदी. वर सांगितलेले चौघे फंदी तमाशा घेऊन होळकरशाहीत गेले. उतारवयात अहिल्याबाई होळकर सांगण्यावरून हे कीर्तन करू लागला, अशी आख्यायिका आहे.
अनंतफंदीस “फंदी” नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरुन यासही लोक फंदी म्हणूं लागले’ अनंत फंदी यांचा ‘‘फंदी अनंतकवनांचा सागर’’ आणि ‘‘समोर गातां कोणि टिकेना’’ असा होनाजी बाळानी गौरव केला होता. ह्या कवनसागरातील फारच थोडी कवने आज उपलब्ध आहेत. याची पदे, लावण्या, कटाव, फटके इ. विविध प्रकारची रचना रसाळ व प्रासादिक आहे.
‘लुंडे गुंडे हिरसे तट्टू’ या याचा उपदेशपर फटका विशेष लोकप्रिय आहे. याने श्रीमाधवनिधन ग्रंथ हे ओवीबद्ध काव्य लिहिले. या काव्याचे सहा अध्याय उपलब्ध असले, तरी सहावा प्रक्षिप्त असावा. दुसऱ्या बाजीरावाची प्रथम याच्यावर मर्जी होती. ‘रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्यांना ‘फटका‘ या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते.
शंकाराचार्यांनी संध्येतील २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. शार्दूलविक्रीडित, शिखरिणी या वृत्तांत त्यांनी रचना केल्या आहेत. दुसऱ्या बाजीरावाचा अधिक्षेप करणाऱ्या याच्या काही लावण्या आहेत. मा.अनंत फंदी यांचा मुलगा सवाई फंदी हेही कवी व कीर्तनकार होते. अनंत फंदी यांचे निधन ३ नोव्हेंबर १८१९ रोजी झाले.
काही रचना अनंत फंदी यांच्या समाजाला एखादी गंभीर गोष्ट कठोर भाषेत पटवून देणे/सांगणे, म्हणजे फटका. फटका काव्यप्रकाराचे जनक म्हणजे कवी अनंतफंदी! कवी अनंतफंदींच्या अनेक फटक्यांपैकी एक उपदेशपर फटका:
बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडुं नको
संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरूं नको
चल सालसपण धरुनि निखालस खोट्या बोला बोलुं नको
अंगि नम्रता सदा असावी राग कुणावर धरूं नको
नास्तिकपणांत शिरुनि जनाचा बोल आपणां घेउं नको
भली भलाई कर कांहीं पण अधर्ममार्गीं शिरूं नको
मायबापांवर रुसूं नको
दूर एकला बसूं नको
व्यवहारामधिं फसूं नको
कधीं रिकामा असूं नको
परि उलाढाली भलत्यासलत्या पोटासाठीं करूं नको
संसारामधि ऐस आपला उगाच भटकत फिरू नको
वर्म काढुनी शरमायाला उणें कुणाला बोलुं नको
बुडवाया दुसर्यााचा ठेवा करुनी हेवा झटूं नको
मी मोठा शहाणा जगामधि गर्वभार हा वाहुं नको
एकाहुनि एक चढी जगामधि थोरपणाला मिरवुं नको
हिमायतीच्या बळें गरिबगुरिबाला तूं गुरकावुं नको
दो दिवसांची जाइल सत्ता अपयश माथां घेउं नको
बहुत कर्जबाजारी होउनि बोज आपुला दवडुं नको
स्ने ह्यासाठीं पदरमोड कर परंतु जामिन राहुं नको
विडा पैजेचा उचलुं नको
उणी तराजू तोलुं नको
गहाण कुणाचें बुडवुं नको
असल्यावर भिक मागुं नको
नसल्यावर सांगणें कशाला गांव तुझा भिड धरूं नको
कष्टाची बरि भाजिभाकरी तूपसाखरेचि चोरि नको
दिली स्थिती देवानें तींतच मानीं सुख कधिं विटूं नको
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेंपुढती पाहुं नको
उगिच निंदास्तुती कुणाची स्वहितासाठीं करूं नको
बरी खुशामत शाहण्याची ही मूर्खाची ती मैत्रि नको
आतां तुज ही गोष्ट सांगतों सत्कर्मा ओसरूं नको
असल्या गांठीं धनसंचय कर सत्कार्यी व्यय हटूं नको
सुविचारा कातरूं नको
सत्संगत अंतरूं नको
द्वैताला अनुसरूं नको
हरिभजना विस्मरूं नको
गावयास अनंतफंददिचे फटके मागें सरूं नको
सत्कीर्तिनौबदिचा डंका गाजे मग शंकाच नको.
अनंत फंदी यांच्या विषयी मा.होनाजी बाळानी एक कविता लिहिली आहे.
फंदी अनंद कवनाचा सागर । अजिंक ज्याचा हातखंडा ॥
चमत्कार चहूंकडे चालतो । सृष्टींवर ज्याचा झेंडा ॥धृ०॥
मूळ संगमनेर ठिकाण त्याचा । कीर्ति उदय जैसा अर्की ॥
नविन तर्हार नारळी डोयीला । पदर पागोटयाची फिर्की ॥
वाचावंत संपत्ती सारखी । बहुतांचें तनमन हारकी ॥
लांगे लुंगे कवि भेदरले । अवघ्यांवर त्याची गुर्की ॥
समोर गातां कोणी टिकेना । मनामधीं बसली कर्की ॥
धन ज्याचा हातचा मळ । केवळ तो रुपयांचा हांडा ॥च० ॥१॥
फंदी आनंदी छंदी वरदी । ब्राह्मण त्याव
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
फटका हा प्रकार लावणी आहे कि अभंग आहे pls reply
Do you know who said?:
“Je ka vyarth pararth hani kariti”, te kon ke durmiti. Do you have the full text?
Probably Waman Pandit.