नवीन लेखन...

संगणकाने वाढविला कष्टकरी महिलांचा आत्मविश्वास

आजचे युग हे संगणक युग आहे. संगणक हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनले आहे. सर्व क्षेत्रातील कामे संगणकामुळे अतितत्पर होऊ लागली आहेत. लहान मुलांपासून वयोवृध्दांपर्यंत सर्वजण संगणक साक्षर झाली आहेत. पुणे जिल्ह्यातील भेकराई नगर येथील महिला बचत गटातील महिला देखील संगणक शिक्षित झाल्या आहेत. संगणक म्हणजे काय हे देखील माहित नसणार्‍या कष्टकरी महिलांनी सराईतपणे संगणक हाताळण्यास सुरवात केली आहे.

मुलेबाळे, घरसंसार व काबाडकष्ट यात पूर्णपणे गुंतलेल्या फुरसुंगीच्या कष्टकरी महिलांना कधीकाळी आपणही संगणक चालवू शकू असे वाटलेही नव्हते. मात्र यशस्वीनी अभियानाने भेकराईनगरच्या कष्टक री वर्गातील दोनशे बचत गट महिलांनाही संगणक साक्षरतेची संधी मिळवून दिली. सतत कष्ट करणार्‍या या महिलांच्या हाताची बोटे की-बोर्डवर कौशल्याने फिरल्याने या महिलांना स्वत:बद्दलच मोठा आत्मविश्वास वाटला !

खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला विकासासाठी सुरू केलेले यशस्विनी अभियान व बारामतीचे विद्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गट महिलांसाठी त्रिमूर्तीनगर येथे मोफत संगणक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

महिला राष्ट्रवादीच्या हडपसर ब्लॉक अध्यक्षा संगीता खोमणे यांनी आयोजित केलेल्या या प्रशिक्षणाच्या उद्घाटनास यशस्विनी अभियानाच्या हवेली तालुका समन्वयक भारती शेवाळे, युथ फाउंडेशनचे अध्यक्ष शौकतभाई शेख, महादेव मैदाड, सुंदरराव निंबाळकर, लक्ष्मण चांदगुडे, बाळासाहेब बहिरट, हनुमंद यादव बा. सी. पवार, उध्दव भोसले पाहुणे म्हणून उपस्थित होते.

एका महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, की बचत गट महिलांनी पापड, लोणची व अगरबत्या बनविण्याबरोबरच संगणक शिक्षण घेतले, आणि त्या संगणकाचा उपयोग व्यवसाय वृध्दीसाठी होऊ शकतो.

विद्या प्रतिष्ठानचे राजेश मांढरे, ज्ञानेश्वर महामुने यांनी दोनशे बचत गट महिलांना संगणक, लॅपटॉप चालविण्याचे प्रशिक्षण दिले. संगणकाशी कधी संबंधच न आलेल्या या महिलांना सुरवातीला की-बोर्ड चालविताना अवघडल्यासारखे झाले. परंतु नंतर मात्र सरावाने त्यांनी संगणकाशी संबंधित विविध क्रिया सहजपणे करून दाखविल्या.

बचत गट फक्त लहानसहान उद्योग न करता आता एकविसाव्या शतकात उपयुक्त असणारे संगणक ज्ञान घेऊन आपली चळवळ वाढवित आहेत. त्यातून त्या आता अधिक सक्षम होत आहेत. हे या चळवळीसाठी पोषक वातावरण असल्याचे लक्षण आहे.

(महान्यूजच्या सौजन्याने)

— बातमीदार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..