श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मुक्तागिरी येथे १६ व्या शतकातील ५२ जैन मंदिरे आहेत. याला लहान सम्मेद शिखर असेही म्हणतात.::

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज यांनी अंबेजोगाई विवेक सिंधु ही मराठी कविता लिहिली. निजामशाहीत म्हणजेच १९४८ पूर्वी या शहराला मोमानाबाद म्हणून ओळखले जायचे.::

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अॅन्ड सर्व्हिसेस कंपनीज ) अहवालानुसार भारतातील ७ शहरात ९० टक्के आयटी व बीपीओ उद्योग आहेत. यात महाराष्ट्रातील मुंबई व पुण्याचा समावेश आहे. औरंगाबाद, नागपूर […]

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ७६८५ किलोमीटर एवढे आहे. येथील महालक्ष्मी मंदिर, गुळाची बाजारपेठ प्रख्यात आहे. चित्रनगरीने शहराचा नावलौकिक वाढवला असून, कोल्हापुरी चप्पल जगप्रसिध्द आहे.::

खजाना विहीर

महाराष्ट्रातील बीड हे अतिशय पुरातन शहर आहे. बिंदूसरा नदीच्या काठी वसलेल्या या शहरानजीक खजाना ही प्रसिध्द विहीर आहे. निजामशहाच्या सलाबत खान या सरदाराने या विहीरीचे बांधकाम केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात ५६ टक्के जंगल

चंद्रपूर जिल्ह्यातील ४ भाग चंद्रपूर जिल्ह्यात भौगोलिदृष्ट्या ४ भाग पडतात. त्यामध्ये काळ्या जमिनीचा मैदानी प्रदेश, उंचसखल प्रदेश आणि पूर्वेचा डोंगराळ प्रदेश, या भागांचा समावेश आहे. नदी खोर्‍यांची सुपीक जमीन आहे. महाराष्ट्रातील जंगलापैकी २० टक्के जंगल […]

पतित पावन मंदिर

महाराष्ट्रातील रत्नागिरी शहरातील प्राचीन मंदिर आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या सूचनेवरुन येथील प्रसिध्द व्यापारी भागोजी सेठ यांनी या मंदिराचे बांधकाम सन १९३१ मध्ये केले.

जल आणि विद्युत संशोधन केंद्र

महाराष्ट्रातील पुणे शहरात केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सिंचन, विद्युत, भूतल परिवहन आणि जल व्यवस्थापनाच्या समस्या सोडविण्यासाठी या केंद्राची स्थापना मुंबईत सन १९१६ मध्ये झाली. मात्र, सन […]

डेव्हीड ससून ग्रंथालय

आल्बर्ट ससून यांनी आपले वडील डेव्हीड ससून यांच्या नावे मुंबईत ग्रंथालय बाधले आहे. त्यावेळी या ग्रंथालयाच्या बांधकामासाठी १लाख २५ हजार रुपये खर्च आला. त्यापैकी ६० हजार ससून यांनी खर्च केले.

शास्त्रीय संगीताचे मिरज शहर

दक्षिण महाराष्ट्रातील मिरज हे एक महत्त्वाचे शहर आहे. मिरज शहर रेल्वे जंक्शन आहे. तसेच वैद्यकीय सोयीसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही हे शहर प्रसिध्द आहे. विविध प्रकारच्या तंतुवाद्यांच्या निर्मितीसाठीही हे शहर प्रसिध्द आहे. प्रख्यात गायक उस्ताद […]

1 2 3 19