अशोक समर्थ ! हिंदी , भोजपुरी तसेच मराठी सिनेसृष्टीतील एक कमी वेळात नावाजलेलं नाव. अशोक समर्थ ह्याचा जन्म बारामती सारख्या लहान पण तितक्याच महत्वाच्या गावात झाला. अशोक समर्थचे लहानपणापासूनच एक यशस्वी कलाकार , अभिनेता बनण्याचे स्वप्न होतं. ते त्याने मेहनत घेत पूर्णही केलं. त्याचे शालेय शिक्षण बारामतीमध्येच पूर्ण झाले आणि तो पदवीच्या शिक्षणासाठी पुण्यात आला. तिथे त्याने आपली पदवी शिक्षण (Graduation) पूर्ण केले. पदवीचे शिक्षण सुरू असताना अनेक नाट्य संस्थांशी त्याचा संबंध आला. ह्यातून त्याला नाटकाचे काही प्रयोग करण्यास मिळाले.
काही दिवसांनी तो आपलं चंदेरी दुनियेतील स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत दाखल झाला. त्याने आपल्या करिअरची सुरुवात “ माझिया प्रियाला प्रीत कळेना ” ह्या झी मराठी वाहिनीवर दाखवल्या जाणाऱ्या मालिकेपासून केली. हा त्याचा मालिका क्षेत्रातील पहिला ब्रेक होता. पुढे काही दिवसांनी त्याला “लक्ष” ही क्राईम genre असलेली मालिका मिळाली. ह्यात त्याने अतिशय महत्त्वाची म्हणजेच ACP अभय किर्तीकर (युनिट ८) नावाचे पात्र साकारले होते. ही मालिका स्टार प्रवाह ह्या मराठी वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आली होती. ही मालिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरली.
पुढे २००५ साली त्याला हिंदी चित्रपटसृष्टीत त्याच्या आयुष्यातील पहिलं काम करण्याची संधी प्राप्त झाली. त्या प्रोजेक्टचं नाव होतं ” इंसान “. ह्याच चित्रपटाला लागून २००५ सालीच त्याने आणखीन एक चित्रपट केला ज्याचं नाव होतं ” निगेहबान : द थर्ड आय. इथून त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्याची यशस्वी घोडदौड सुरू झाली. त्याने Ties Of Blood , एक चालीस की लास्ट लोकल , वीर , Right या Wrong , अशोक चक्र : Tribute to real heroes , आया सावन झुम के आणि क्रांतिवीर : The Revolution सारखे अनेक दर्जेदार चित्रपट केले. झगमगत्या दुनियेत प्रवास करत असताना अचानक त्याची गाठ रोहित शेट्टी सारख्या दिग्गज दिग्दर्शकाशी पडली आणि खऱ्या अर्थाने त्याचं नाव उज्वल करणारं प्रोजेक्ट त्याला मिळालं. ते प्रोजेक्ट होतं ” सिंघम “. ह्या प्रोजेक्टनं एक अभिनेता म्हणून त्याचं नाव अजून मजबूत केलं आणि बॉलीवूडमध्ये त्याच्या नावाचं एक वेगळंच वलय निर्माण झालं.
पुढे त्याने रावडी राठोड , अचल रहे सुहाग , गली गली चोर है , Married 2 America हे चित्रपट केले.
मराठी चित्रपटसृष्टीतही त्याने आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. मराठीत त्याने वावटळ , मरेपर्यंत फाशी , थोडं तुझं थोडं माझं , विटी दांडू , बेधडक , दंडीत आणि अनेक दर्जेदार चित्रपट केले.
आताच काही दिवसांपूर्वी तो रोहित शेट्टीच्या ” सिंबा “ ह्या बहुचर्चित चित्रपटात वकीलाच्या भूमिकेत दिसला होता. सरतेशेवटी , अशोक समर्थ हे नाव सगळ्याच चित्रपटसृष्टीत गाजत राहिल असं म्हणणं वावग ठरणार नाही.
## Ashok Samartha
Leave a Reply