अभिजीत केळकर

प्रसिद्ध अभिनेता

अभिजीत केळकर हा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचा जन्म २१ मार्च १९८२ रोजी मुंबईत झाला. तसं पाहायला गेलो तर त्याने अभिनय क्षेत्रात महाविद्यालयात असताना काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी त्याने बऱ्याच एकांकिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती. अभिजीतने रंगभूमीवरही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहीत केले. त्याने लुकाचुपी , एकदा पहावे करून ही नाटकं केली आहेत. त्याला २०१४ साली ” एकदा पहावे करून “ या नाटकासाठी मटा सन्मान सोहळ्यात पुरस्कार मिळाला होता.

त्याला अभिनेता म्हणून खरी ओळख प्राप्त झाली ती “ऊन पाऊस” या मराठी मालिकेपासून. त्यात त्याने राकेश सरदेसाई नामक तरुण पात्र साकारलं होतं. ही मालिका २००५ साली प्रदर्शित झाली होती. यानंतर त्याने “मधु इथे आणि चंद्र तिथे”“तुझं माझं जमेना” या मालिकांमध्येही पात्र साकारलं होतं. पुढे तो मराठी बिग बॉस सीजन टू मध्ये दिसला.

त्याचं  चित्रपट सृष्टीत पदार्पण ” मी शिवाजीराजे भोसले बोलतोय “ या बहुचर्चित मराठी चित्रपटातून झालं. हा चित्रपट चित्रपटगृहात , ३ एप्रिल २००९ साली प्रदर्शित झाला होता. त्यात ह्याने सचिन खेडेकरसारख्या मातब्बर कलाकाराच्या मुलाचे पात्र साकारले होते. चित्रपटात त्या पात्राचं नाव राहुल दिनकर भोसले असे आहे. पुढे त्याने बालगंधर्व (२०११) , काकस्पर्श (२०१२) आणि अनेक मराठी चित्रपटात काम केले.

## Abhijit Kelkar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*