यवतमाळ जिल्ह्यातील बहुसांस्कृतिक कायर

कायर हे गाव यवतमाळ जिल्ह्यातील वणीपासून २० किमीवर विदर्भ नदीच्या तीरावर वसले आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या नागपूर सर्कलतर्फे येथे सध्या सुरू असलेल्या उत्खननात सातवाहनकालीन संस्कृतीच्या खुणा सापडल्या असून, या बहुसांस्कृतिक ठिकाणी त्याही पूर्वीच्या संस्कृतीच्या खुणा […]

यवतमाळ जिल्हा

यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. कापूस म्हणजेच ‘पांढरे सोने’ मोठ्या प्रमाणावर पिकवणारा जिल्हा अशी या जिल्ह्याची ख्याती आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला […]

यवतमाळ जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. वर्धा व पैनगंगेच्या खोर्‍यातील काळ्या कसदार जमिनीमुळे येथे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. जिल्ह्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र ८,४७,६०० हेक्टर्स इतके आहे.ज्वारी हे जिल्ह्‌यातील प्रमुख पीक असून […]

यवतमाळ जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

श्री. वसंतराव नाईक – प्रसिद्ध कृषितज्ज्ञ व महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांचा जन्म यवतमाळमधील गहुली या ठिकाणी झाला. ते सुमारे बारा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राज्यात सर्वात जास्त काळ असलेले मुख्यमंत्री म्हणूनही […]

यवतमाळ जिल्ह्यातील लोकजीवन

या जिल्ह्यात अनेक जाती-जमातीचे लोक राहतात. कुणबी, माळी, बंजारा, आंध, गोंड, परधान, आणि कोलाम या काही प्रमुख जमाती या जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. येथे मराठी बरोबरच बंजारी, कोलामी इत्यादी बोलीभाषाही बोलल्या जातात. प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन […]

यवतमाळ जिल्ह्याची भौगोलिक माहिती

यवतमाळ महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १३,५८४ चौ.कि.मी. आहे जे महाराष्ट्राच्या ४.४ % इतके आहे, तर लोकसंख्या २७,७५,४५७ (सन २०११ च्या जनगणनेनुसार) आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ […]

यवतमाळ जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

मुरली- येथे पैनगंगा नदीवर सहस्रकुंड धबधबा आहे. पुसद – पूस नदीवरील पुसद हे ऐतिहासिक महत्वाचे गाव आहे. वाकाटक कालीन शिवमंदिराचे अवशेष येथे सापडले आहेत. कळंब – विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर यवतमाळ नागपूर […]

यवतमाळ जिल्ह्यातील दळणवळण सोयी

वाराणसी-कन्याकुमारी (किंवा नागपूर-हैदराबाद) हा राष्ट्रीय महामार्ग क्र ७ यवतमाळ जिल्ह्यातून जातो. वडकी, करंजी, पांढरकवडा व पाटणबोरी ही या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे आहेत. मूर्तीजापूर-यवतमाळ या लोहमार्गामुळे यवतमाळ रेल्वे दृष्ट्या भुसावळ-नागपूर या प्रमुख लोहमार्गाशी जोडले गेले […]

यवतमाळ जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

मोठ्या प्रमाणावर सापडणारी चुनखडी हे या जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. वणी तालुक्यात राजूर, चनाखा, परमडोह, सिंदोला या भागात अधिक प्रमाणात चुनखडक सापडतो. राळेगाव तालुक्यातील गौराळा व मारेगाव तालुक्यातील मुकुटवन येथेही चुनखडक सापडतो. जिल्ह्यातील राजूर, वणी, […]

1 2