यवतमाळ जिल्हा

यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. कापूस म्हणजेच ‘पांढरे सोने’ मोठ्या प्रमाणावर पिकवणारा जिल्हा अशी या जिल्ह्याची ख्याती आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.मोठ्या प्रमाणावर सापडणारी चुनखडी हे या जिल्ह्याचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य. या जिल्ह्याने लोकनायक अणे यांच्यासारखे नररत्न भारताला दिले. राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर दीर्घकाळ राहून राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करणारे वसंतराव नाईक हेदेखील याच जिल्ह्यातले होत.