महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते. याशिवाय बॉक्साईट, चुनखडी, इल्मेनाइट, क्रोमाइट आणि बांधकामाचे खडक यांचे वैशिष्ट्यपूर्ण साठे महाराष्ट्रात आहेत, तर डोलोमाइट, कायनाइट, सिलिकायुक्त वाळू व काही उद्योगधंद्यात वापरल्या जाणार्‍या मृतिका यांचे साठे आहेत. […]

चीनमधील माऊंट हुआंगशांग

चीनच्या सांस्कृतिक इतिहासात हुआंगशांग पर्वताला महत्त्वाचे स्थान आहे. चित्रकार, लेखक, कवी यांच्यासाठी हा पर्वत प्रेरणादायी असल्याचे चीनमधील नागरिकांचे मत आहे.      

इटलीतील माऊंट एटेना

  इटलीतील सिसिली प्रांतात असलेल्या माऊंट एटेना हा जागृत ज्वालामुखी आहे. १९,२३६ हेक्टर क्षेत्रातील या ज्वालामुखीचा २७०० वर्षापासूनचा लिखित स्वरुपातील इतिहास पहावयास मिळतो.

पंढरपूरची चंद्रभागा नदी

भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ठेवताच प्रथम चंद्रभागेत स्नान करून पावन होतात. भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. ती महाराष्ट्रात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून […]

सातपुडा पर्वतश्रेणी

महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीवर सातपुडा पर्वतश्रेणी आहे. तिच्या दक्षिणेस तापी-पूर्णा खोरे आहे. सातपुड्याच्या धुळे जिल्ह्यातील डोंगररांगांना तोरणमाळचे डोंगर असे संबोधले जात असून येथील तोरणमाळ शिखराची उंची १, ०३६ मी. आहे. अमरावती जिल्हातील डोंगररांगांना गाविलगड टेकड्या, मेळघाट […]

काश्मीर खोरे

जम्मू आणि काश्मीर हे खोर्‍यांचे प्रदेश म्हणूनही ओळखले जाते. काश्मीर खोरे हे या भागातील महत्त्वाचे खोरे असून, त्याची रुंदी जवळपास १०० किलोमीटर आहे. हिमालयाच्या विशाल पर्वतराजीने काश्मीर खोरे व लद्दाखला विभागले आहे. पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून […]

उज्जैन येथील यंत्रमहल

श्री वेधशाळा म्हणजेच यंत्रमहल मध्यप्रदेशातील उज्जैन येथे आहे. तिचा उपयोग पंचांग तयार करण्यासाठी होतो. सूर्य, नाडी, शंकुयंत्र वेधशाळेत असून पंचांगासोबतच प्राचीन कलाकृतीचेही ज्ञान वेधशाळा देते.      

कोकणचा गाभा असलेली जांभी मृदा (लॅटेराईट)

सतत ओला व कोरडा ॠतू आलटून पालटून असणा-या व २००० मि.मी. पेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात जांभी मृदा आढळते. ही मृदा दक्षिण महाराष्ट्रातील कोकण परिसरात, कोल्हापूरचा प. भाग, सह्याद्रीचा घाटमाथा, चंद्रपुर व गडचिरोली जिल्हयात आढळते. ही […]

1 2 3 5