महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते. याशिवाय बॉक्साईट, चुनखडी, इल्मेनाइट, क्रोमाइट आणि बांधकामाचे खडक यांचे वैशिष्ट्यपूर्ण साठे महाराष्ट्रात आहेत, तर डोलोमाइट, कायनाइट, सिलिकायुक्त वाळू व काही उद्योगधंद्यात वापरल्या जाणार्‍या मृतिका यांचे साठे आहेत.

खनिजसंपत्तीचे क्षेत्र

महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी फक्त १२.३३ टक्के क्षेत्रात खनिजसंपत्ती आढळते.

राज्यातील पूर्व विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, आणि यवतमाळ जिल्हे, तर कोंकण व दक्षिण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि कोल्हापूर जिल्हा ही खनिजसंपत्तीची मुख्य क्षेत्रे आहेत.

राज्यांत प्रमुख खनिजांच्या उत्खननासाठी २८५ पट्टे व गोंण खनिजांचे २०३ आहेत.

मॅंगनीजचे प्रमुख साठे

महाराष्ट्रात मॅंगनीजचे प्रमुख साठे विदर्भात भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांत आहेत. त्या खालोखाल कोंकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा क्रमांक लागतो.

देशातील एकूण साठ्यांपैकी ४० टक्के मॅंगनीज साठा एकट्या महाराष्ट्रात आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*