आजीबाई वनारसे

एका बेफाम जिद्दीची गोष्ट

राधाबाई,………

यवतमाळ च्या रस्त्यावर भाजी विकणारी एक निरक्षर विधवा महिला. ५ मुली पदरात आणि अठराविश्व दारीर्द्र्य घरात. अचानक एक दिवस इंग्लन्दाहून तिच्याच समाजातील एक माणूस उगवला. त्याची बायको हि नुकतीच देवाघरी गेली होती. समाजातील प्रथे प्रमाणे दुसरे लग्न करणे भाग होते. मग कोणा मध्यस्थाने दिला या दोघांचा पाट लावून.

नवीन नवरा हिला घेऊन बोटीने लंडनला गेला. बरोबर पाचातल्या दोन मुली घेतल्या. बाकीच्यांना नातेवाईकांच्या भरवशावर इथेच ठेवले.तिथे त्याच्या मुलांनी हिला ठेऊन घ्यायला नकार दिला. मग कसाबसा हा अजब संसार चालू राहिला. एक दिवस आकाश कोसळले. थोड्या आजाराचे निमित्त होऊन नवर्याचा मृत्यू झाला. नंतर काही दिवसातच घरातल्यांनी ह्या बाईच्या हातात बोटीची ३ तिकिटे आणि ५० पौंड ठेवले आणि घरा बाहेर काढले. ते हि ऐन हिवाळ्यात.

बाईच्या हाताल धरून दोन लहानग्या मुली, एक वळकटी आणि जेमतेम चार इंग्रजी शब्द .यावर हि अशिक्षित ९ वारी नेसलेली बाई लंडन च्या बर्फात सुन्न होऊन उभी होती. एका जवळ राहणार्या भल्या ज्यू माणसाने तिला घरी नेले आणि कसाबसा संवाद साधत तुला काय येते विचारले. हि म्हणाली “स्वयंपाक”.

राधाबाईंवरील संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

## Ajibai Vanarase

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*