आपल्या संगीताने अनेक गाणी अजरामर करणारे ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक हे मुळ अकोला जिल्ह्याचे. मोडक यांनी आपल्या गावालाच शाळेत शिक्षण घेतले. तेथेच त्यांनी संगीताचे धडे गिरवले. संगीतात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांनी पुण्याची वाट निवडली.
पीडीएच्या घाशिराम कोतवालमधून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. सतीश आळेकरांच्या “महानिर्वाण” या नाटकाने त्यांना संगीतकार चख्याती मिळवन दिली.
“नाटक”,”आकाशवाणी”,”दूरचित्रवाणी” आणि त्यानंतर “चित्रपट” असा त्यांचा संगीतप्रवास होत गेला.सतत विविध प्रयोग करत राहणे हे आनंद मोडक यांच्या संगीताचे वैशिष्ट्य म्हणता येईल. तालवाद्याची साथ न घेता संगीतबध्द केलेली खानोलकरांची गाणी हा त्यातीलच एक प्रयोग. कुमार गंधर्वांच्या गायकीचा आपल्यावर प्रभाव आहे, असे ते नेहमीच सांगत.
“चौकट राजा”, “मुक्ता”, “हरिश्चद्रांची फॅक्टरी” या सिनेमातील त्यांचं संगीत विशेष गाजले. संगीताची आवड सुरु ठेवत त्यांनी महाराष्ट्र बँकेतील आपली नोकरीही पूर्ण केली.
मोडक यांनी सादर केलेले “अभंगगाथा”,”साजणवेळा”,”शेवंतीचं बन”,”प्रीतरंग”,”अख्यान तुकोबाचे” हे सांगितीक कार्यक्रमही लोकप्रिय ठरले तर, “तीन पैशाचा तमाशा”, “महानिर्वाण”, “बेगम बर्वे”, “पडघम” अश्या नाटकांना सुध्दा त्यांनी संगीत दिले आहे; त्याशिवाय आनंद मोडक यांनी संगीतबध्द केलेले चित्रपट म्हणजे “मसाला” , “डॅम्बिस” , “उमंग” , “समांतर” , “दोहा” , “दिवसेंदिवस” , “नातीगोती” , “जिंदगी जिंदाबाद” , “तु तिथे मी” , “आई” , “लपंडाव” , “चौकटराजा” , “दिशा” , “२२ जून १८९७” तसंच २०१४ प्रदर्शित झालेल्या “यशवंतराव चव्हाण-बखर एका वादळाची” या चित्रपटालाही मोडक यांनी संगीत दिले असून आपल्या कारकीर्दित एकूण १० नाटके, ३६ चित्रपट, ७ हिंदि आणि ८ मराठी सिरीयलला आनंद मोडक यांनी संगीबध्द केले आहे.
२३ मे २०१४ या दिवशी म्हणजे वयाच्या ८३ व्या वर्षी आनंद मोडक यांचे तीव्र ह्रदयाच्या धक्क्याने आनंद मोडक यांचे निधन झाले.
(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)
आनंद मोडक यांच्यावरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
## Modak, Anand
Leave a Reply