आलू पराठा

Aloo Paratha

साहित्य : ४ मध्यम आकाराचे बटाटे, २ हिरव्या मिरच्या, १ तुक्या आलं, पाव चमचा जिरे पावडर, लाल तिखट, कोथिंबीर, मीठ, तेल, एक वाटी कणीक, अर्धी वाटी मैदा.

कृती : बटाटे चांगले उकडून थंड झाल्यावर सोलावेत. मिरची,आते यांची पेस्ट करावी. बटाटे थंड झाल्यावर किसून घ्यावेत किंवा कुस्करावेत. यात मिरची, आल्याची पेस्ट, जिरे पावडर, चवीपुरते मीठ व बारीक कोथिंबीर घासून चांगले मळावे. हे झाले सारण. कणीक चाळून कणीक व मैदा साधारण घट्ट भिजवून तयार केलेल्या सारणाचे लहान-लहान गोळे करावेत. गोळ्याच्या दीडपट आकाराचे पिठाचे गोळे करून त्यात पुरणाच्या पोळीप्रमाणे सारण भरावे व हलक्या हाताने पराठे लाटावेततव्यावर थोडे-थोडे तेल घालून दोन्ही बाजूंनी पराठे गुलाबी रंगावर भाजावेत. (बाजारात तेल लावण्यासाठी ब्रश मिळतो)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*