बिरडं

साहित्य : वाल, १ टिस्पून तेल, १/४ टिस्पून मोहरी, १/२ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग,१/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट ,४ कडीपत्ता पाने, १ टिस्पून जिरे, १ टिस्पून गूळ, २ आमसुलं, १/४ कप कोथिंबीर, चवीनुसार मीठ. कृती ः वाल कोमट पाण्यात १० ते १२ तास भिजत ठेवावे. नंतर पाणी काढून टाकून भिजलेले वाल मोड आणण्यासाठी पंच्यात ८ ते १० तास गच्च बांधून ठेवावे. डाळींब्यांना मोड आले कि कोमट पाण्यात १० मिनीटे टाकून ठेवावे. डाळींब्या सोलून घ्याव्यात. मोड आलेल्या डाळींब्या हाताळताना त्या अख्ख्या राहतील याची काळजी […]

दुधी हलवा

साहित्य : किसलेला दुधी भोपळा (सोलून बिया काढून), १ टिस्पून तूप,पाऊण कप कंडेन्स मिल्क,१ टिस्पून बदामाचे काप (बदाम भिजवून साल काढावे),१ टिस्पून इतर ड्रायफ्रुट्स जसे काजू,पिस्ता,बेदाणे,१/४ टिस्पून वेलची पूड. कृती ः पॅन गरम करुन त्यात तूप घालावे. तूप वितळले कि किसलेला दुधी घालून परतावे. साधारण १० मिनिटांमध्ये दुधीमधील पाणी निघून जाईल.दुधी शिजला कि कंडेन्स मिल्क घालावे आणि घट्टपणा येईस्तोवर परतत राहावे. सुकामेवा घालावा,वेलची पूड घालून मिक्स करावे. थोडावेळ परतून […]

मुगाचा डोसा

साहित्य ः मुगाची डाळ, हळद,तिखट, चवीनुसार मीठ. कृती : पिवळ्या मुगाची डाळ ३० मिनिटे पाण्यात भिजवून मिक्सर मधून फिरवून घ्या. त्यात हळद, तिखट, चवीनुसार मीठ घालून पूर्ण एकजीव करुन घ्या. आणि एका पॅनमध्ये तूप किंवा तेल घालून त्यावर डोसे सोडा. यातच बारिक चिरलेला कांदा,टोमॅटो,कोथिंबीर,चीज घालून सर्व्ह करु शकता.  

सोड्याची खिचडी

साहित्य : एक पेला तांदूळ, अर्धा वाटी कापलेले सोडे, दोन पेले नारळाचे दूध, एक टीस्पून लसूण पेस्ट,तिखट,दोन मोठे कांदे,८ लवंगा,८ मिरे,दोन बडी वेलची, ४ हिरव्या वेलच्या,दोन काड्या दालचिनी,दोन तमालपत्र,एक टी स्पून शहाजिरे,हळद,चवीनुसार मीठ,चवीपुरती साखर,दोन पाकळ्या लसूण. कृती ः प्रथम एक पेला तांदूळ धुऊन निथळत ठेवावे. मग अर्धी वाटी सोडे धुऊन त्याला हळद,मीठ,लसूण पेस्ट चोळून थोडा मसाला लावावा. धुतलेल्या तांदुळाला हळद,मीठ,तिखट आणि एक टी स्पून शहाजिरे चोळून ठेवावे. ज्या भांड्यात खिचडी […]

कांदे पोहे

साहित्य : तेल, हिंग, मोहरी, कांदा, हिरवी मिरची, कडीपत्ता, बटाटे, पोहे, लिंबाचा रस, हळद, धणे पावडर, हवे असल्यास शेंगदाणे, चवीनुसार मीठ. कृती : प्रथम कढई मध्ये तेल तापवून घ्या. तेल तापल्यावर त्यात हिंग, मोहरी, हिरवी मिरची, कडीपत्ता […]

पालक उडदाचे वडे

साहित्य : पालक, उडदाची डाळ,हिरवी मिरची, कांदा, जिरे, चवीनुसार मीठ. कृती : आदल्या रात्री उडदाची डाळ पाण्यात भिजवत ठेवा. प्रथम पालकाची जुडी छान पाण्याने धुवून, चिरुन थंड पाण्यात ठेवून द्या. (पालक थंड पाण्यात ठेवला असता त्याचा हिरवा रंग तसाच […]

अंड्याचा पदार्थ – Egg Shakshouka

साहित्य : ४ अंडी,तेल,कांदा,टोमॅटो,धणे-जिरे पावडर,तिखट,हळद,कोथिंबीर,मीठ. कृती : प्रथम एका पॅनमध्ये तेल तापवून घ्या. त्यावर एक बारिक चिरलेला कांदा चांगला लालसर परतून घ्या. मग त्यात टोमॅटो घालून परतून घ्या. त्यात धणे-जिरे पावडर,हळद,तिखट,मीठ घाला व थोडा पाण्याचा हपका मारुन हे […]

काया टोस्ट

साहित्य : ब्रेड स्लाईस, काया जॅम, बटर. कृती : प्रथम ब्रेड चे स्लाईस मंद आचेवर थोडेसे लालसर भाजून घेणे. त्यानंतर त्यावर काया जॅम लावून बटर चा पातळ असा पूर्ण थर त्यावर ठेवावा आणि सर्व्ह करावे. […]

काया जॅम

साहित्य : अंडी, साखर, नारळाचे दूध, पांदान पाने ( ही पाने साऊथ ईस्ट एशिया, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, फिलीपाईन्स, थायलंड या शहरात मिळतात. ) कृती : अंडी आणि साखर एकत्र करुन घेणे. त्यानंतर नारळाच्या दूधात पांदान […]

आजचा विषय केळी भाग तीन

फळं जास्त वेळ चांगल्या अवस्थेत राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवली जातात. त्या अवस्थेत ती ताजी राहतात. मात्र केळी फ्रिजमध्ये ठेवत नाहीत. चुकून जरी ठेवलं गेलं तरी ते ताबडतोब वरून काळं पडतं. उष्ण प्रदेशातील फळं विशेषत: केळयांवर थंडीचा […]

1 2 3 84