साबुदाणा वडा

साहित्य : १ कप साबुदाणे, २ मोठे बटाटे उकडून, ५-६ तिखट हिरव्या मिरच्या, १/४ कप चिरलेली कोथिंबीर, १/२ टिस्पून जीरे, १/४ ते १/२ कप शेंगदाण्याचे कूट, १/२ लिंबाचा रस, चवीपुरते मीठ, वडे तळण्यासाठी तेल.

कृती : साबुदाणे पाण्यात भिजवावे. उरलेले पाणी काढून टाकावे. झाकण ठेवून ४ ते ५ तास भिजत ठेवावेत. शिजलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे. मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात. शेंगदाण्याचे कूट : शेंगदाणे भाजून त्याची साले काढावीत आणि मिक्सरवर भरडसर बारीक करावेत. भिजवलेले साबुदाणे, बटाटे, मिरच्यांचे वाटण, जीरे, शेंगदाण्याचे कूट, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे. भिजवलेल्या मिश्राणाचे छोटे गोळे तयार करावेत. कढईत तेल गरम करावे आणि मीडियम हाय गॅस वर गोल्डन ब्राउन तळावेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*