इडली

साहित्य : १/२ कप उडीद डाळ, दिड कप इडली रवा, चवीपुरते मिठ, १/४ कप पातळ पोहे, १ टिस्पून साखर.

कृती : इडली रवा आणि उडीद डाळ वेगवेगळ्या भांड्यात ५ तास भिजत घालावे. इडली रवा भिजेल इतपतच पाणी घालावे. रवा पातळ करू नये. पातळ पोहे इडली रव्यातच भिजवावे. नंतर भिजलेली उडीद डाळ मिकसरवर अगदी थोडे पाणी घालून एकदम बारीक करून घ्यावी. वाटण एकदम मिळून आले पाहिजे. डाळीचे कण राहता कामा नयेत. भिजवलेला रवा-पोह्याचे मिश्रण, साखर आणि मिठ उडीद डाळीच्या वाटणात घालून एकदा मिक्सरमध्ये फिरवावे. वरुन झाकण ठेवून १० ते १२ तास मिश्रण आंबू द्यावे.
मिश्रण आंबले की नीट ढवळून घ्यावे. इडली पात्राला थोडे तेल लावून मिश्रण घालावे. इडली कूकर मध्ये किंवा साध्या मोठ्या कूकर ३ इंच भरेल एवढे पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळले की भरलेले इडली पात्र आत ठेऊन १२ ते १५ मिनिटे वाफ काढावी. गॅस बंद करून ५ मिनीटे वाफ जिरू द्यावी. इडली पात्र बाहेर काढून इडल्या सुरीने किंवा चमच्याने अलगदपणे काढाव्यात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*