तांदुळाची खीर

Rice Kheer

साहित्य :

७ चमचे तांदूळ
१ लिटर दूध
१० चमचे साखर
२ वेलदोडे (पूड)
सुकामेवा काजू
बदाम
चारोळ्या यापैकी असेल ते (नसले तरी चालेल)

पाककृती :

तांदूळ धुवून १५-२० मिनिटे बाजूला ठेवावेत.
दूध तापवून त्याला उकळी आली की त्यात तांदूळ घालावे व सतत ढवळत राहावे.
सुमारे तीस मिनिटे मंद गॅसवर शिजवावे.
तांदळाचा दाणा हाताने दाबून पाहावा. मऊ झालेला असला व चटकन दाबला गेला की साखर घालावी व पाच मिनिटे आणखी चुलीवर ठेवून ढवळत राहावे.
फार दाट वाटल्यास कपभर दूध घालावे.
खाली उतरवून खीर गार झाली की त्यात वेलचीपूड व काजू, बेदाणे घालावे.
ही खीर जेवणानंतर पुडिंगसारखी बाऊलमध्ये घालून खायला द्यावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*