विड्याचे पान शास्त्रोक्त व वैज्ञानिक महती..!

बारीक नाजूक छान दिसणारा वेल पाने गुळगुळीत, चमकदार, लांब देठची, हृदयाच्या आकाराची एक टोक असणारी. एका आड एक पाने येतात पेराला मुळे फुटतात. हा वेल पुढे वाढत जातो.

———————————————–
विड्याच्या पानाच्या उत्पतिची कथा
———————————————-

समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. तरी थोडे अमृत शिल्लक राहिले. मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंताजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृता मधून वेळ उगवली नागाप्रमाणे खुन्तावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाने असलेली वेळ पाहून देवांना आनंद झाला व तिला नागवेल असे म्हटले.भोजन झाल्यावर देव देवता पानाचा विडा आवडीने खाऊ लागले. देवाला महानैवैद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा, दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली

१)खाण्यासाठी जी पाने पिकलेली मधूर स्वादाची लहान पातळ असतात ती उत्तम औषधी गुणधर्म. रुची वाढवणारे, कांतीदायक, कफनाशक, सारक, शक्तीवर्धक, वायूनाशक, पोटसाफ ठेवणारे, पाचक, पित्तकारक, शरीरशुध्दी करणारे.
सर्वसामान्य उपाय सारखे नाक गळत असल्यास पानाचा एक चमचा रस घेउन थोडा कोमट करुन मधाबरोबर खाल्यास बरे वाटते.
२) सारखा कफ पडतो व छाती भरलेली असते अशा वेळी विड्याच्या पानांचा रस व अडूळसा रस असे मधामधून घेतले तर उतार पडतो.

३)गोडाधोडाचे जेवण झाल्यावर विडा खाल्यास पचन व्यवस्थित होते.
४)नियमितपणे साधा घरगुती विडा खाण्यास ठेवला तर शौचास साफ होते.
५)विड्याची पाने वाटून जखमेवर पोटीस लावले तर दोन दिवसात जखम भरते.
६)पान खाल्याने तोंडाची अरुची चिकटपणा व दुर्गंधी जाते.
पानात असणारा तिखटपणा जंतुनाशक असतो. त्यामुळे पान नुसते चावून खाल्ले तरी दात व तोंडासाठी ते उत्तम असते. शिवाय असे करणे दात किडिला प्रतिबंध करते.
६)पानात चुना, कात घातल्यास ते त्रिदोषाहारक होते मन प्रसन्न करते.
७)लहान मुलांच्या पोटफुगीवर नागवेलीच्या पानाचा रस व मध यांचे मिश्रण चाटवले तर मुलांचे अपचन दुर होते.
८) पानातील कॅल्शिअम शरीरामध्ये सहजतेने शोषले जात असल्याने विड्याचे पान जरुर खावे.
————————————————-
विड्याची पाने आणि त्याचं शास्त्रोक्त महत्व :
————————————————-

१) या विड्याच्या पानाच्या टोकास “लक्ष्मी” चा वास असतो.
२) विडयाच्या पानाच्या उजव्या बाजूस “ब्रम्हदेवांचा” वास असतो.
३) या विडयाच्या पानाच्या मधोमध “सरस्वती देवीचा” वास असतो.
४) विडयाच्या पानाच्या डाव्या बाजूस “पार्वतीदेवीचा” वास असतो.
५) या विडयाच्या पानाच्या लहान देठा मधे “महाविष्णूचा” वास असतो.
६) विडयाच्या पानाच्या मागीलबाजूस “चंद्रदेवता” वास
असतो.
७) या विडयाच्या पानाच्या सर्व कोपऱ्या मधे “परमेश्वरा” चा वास असतो.
८) विडयाच्या पानाखाली “मृत्युदेवते”चा वास असतो.
(या कारणाने ताम्बूलसेवन करतांना बुडाचा भागकाढून मग सेवन करण्याची पद्धत).
९) विडयाच्या पानाच्या देठात “अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी” राहतात.
(म्हणूनच पान सेवन करतांना देठ काढून देतात. अहंकार आणि दारिद्रय लक्ष्मी येऊ नये याअर्थी..)
१०) विडयाच्या पानात मध्यभागा नंतर मन्मथाचा वास असतो.
यासर्व देवतांचा विडयाच्या पानामधे वास असल्यामुळे ताम्बूलास इतके महत्त्व आहे.
पूर्व किंवा उत्तरदिशेस पानाचे टोक येईल असे ठेऊन देवास नैवेद्य दाखवावा.
कोणा कडेही तांबूल दिल्यास ते देवापुढे ठेवून नमस्कार करून मगंच तो उपभोगावा.
मंगळवारी, शुक्रवारी कोणत्याही कारणे विडयाची पाने घरा बाहेर जाऊ देऊ नयेत.
हिरवीगार आणि मस्त हस्ताकार असलेली कोवळी पाने नैवेद्यास ठेवावीत आणि तांबूल म्हणून द्यावीत..

Avatar
About खाद्यपदार्थ WhatsApp ग्रुप 71 Articles
श्री. संजीव वेलणकरांच्या ”मराठी खाद्यपदार्थ” या WhatsApp ग्रुपवरील पाककृती...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*