साहित्य: ५०० ग्रा. कणीक,२०० ग्रा. किसलेली कोबी, १ जुडी कापलेली कोथंबीर, १ चमचा गरम मसाला, १/२ चमचा मीठ, ३/४ चमचे लाल मिरची, १ तुकडा बारीक कापलेले अदरक,२ कापलेली हिरवी मिरची, तूप तळणासाठी.
कृती: कणीक मध्ये एक चिमूटभर मीठ मिळवून घट्ट मळावे. कोबीत कोथिंबीर, गरम मसाला, उरलेले मीठ, लाल मिरची, आले व हिरवी मिरची टाकुन थोड्याशा तुपात दोन मिनीट फ्राय करून उतरावे. पिठाचे बरोबर ८ गोळे करावे. एकास लाटून कोबी भरावा व तव्यावर शेकावी. अशा पद्धतीने सर्व पराठे बनवून दह्याबरोबर किंवा चटणी सोबत गरम गरम वाढावे.
Leave a Reply