कराईकल

कराईकल हे पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या या शहराचा कारभार महानगरपालिकेमार्फत चालतो. संस्कृत साहित्यात या शहराचा उल्लेख कराईगिरी असा केलेला आढळतो. १७३९ पर्यंत येथे तंजावरचे राजे प्रतापसिंग यांची सत्ता होती. त्यानंतर काही काळ ब्रिटिश व नंतर बरीच वर्षे फ्रेंचांची राजवट येथे होती.

स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष
देश स्वतंत्र झाल्यानंतरही येथे फ्रेंच सरकारची राजवट होती. फ्रेंच सरकारच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी इथल्या जनतेने मोठा संघर्ष केला. अखेर त्यांच्या संघर्षाला यश येऊन १ नोव्हेंबर १९५४ रोजी हे शहर स्वतंत्र भारतात समाविष्ट झाले. या शहरात मोठे आंतरराष्ट्रीय बंदर आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*