कासरगोड

कासरगोड हे केरळ राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. येथील पद्मनाभस्वामी मंदिर, मधूर मंदिर, मलिक दिनार मस्जिद प्रसिद्ध आहेत. तसेच चंद्रगिरी किल्ला व बेकल किल्ला हे दोन किल्लेही प्रेक्षणीय आहेत. ते पाहण्यासाठी देशभरातील पर्यटक येथे मोठ्या संख्येने येतात. मल्ल्याळम, कन्नड व तुलू या भाषा येथे प्रामुख्याने बोलल्या जातात.

औद्योगिक शहर
कासरगोड जवळच्या थलंगरा येथील जहाजबांधणी उद्योग देशभर प्रसिद्ध आहे. येथे अनेक लहान-मोठ्या जहाजांची बांधणी केली जाते. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीचे एक युनिट या शहराजवळ आहे. तसेच केंद्र शासनाचे नारळ संशोधन केंद्रही येथेच आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*