झटपट ढोकळा

साहित्य : 1 ½ वाटी बेसन , आल 1 इंच ,हिरवी मिरची चवीनुसार ,मीठ चवीनुसार, साखर 2 चमचे ,एक लिंबाचा रस _ साधारण 4/5 चमचे(पोहे खायचा चमचा),जिरे पाव चमचा, एक ईनो पाकीट, पाणी आवश्यकतेनुसार.

फोडणीसाठी : 2 चमचे तेल, मोहरी जिरे ,कढीपत्ता ,4/5 चमचे पाणी साखर आणि लिंबू रस 2 चमचे.

कृती : 
बेसन मध्ये साखर मीठ लिंबू रस घालावे. आल, मिरची, जिरे मिक्सर ला बारीक करून बेसन मध्ये मिक्स करावे. व पाणी घालून भजी पीठ पेक्षा थोडे पातळ पीठ भीजवावे.आता एका पसरट भांड्याला तेल लावून ठेवावे (मी कुकर चे भांडे वापरले ) कूकर मध्ये पाणी टाकून गरम होऊ द्यावे .आता तयार केलेल्या मिश्रणामध्ये ईनो मिक्स करावा आणि पटकन मिश्रण एकत्र ढवळून तेल लावलेल्या भांड्यात ओतावे आणि कुकर मध्ये 10ते 12 मिनिटे शिट्टी न लावता वाफवून घ्यावा .

फोडणी :
तेल गरम झाले की त्यात मोहरी टाकून तडतडली की जिरे ,कढीपत्ता टाकावा आणि गेस बंद करावा .4/5 चमचे पाण्यात साखर आणि लिंबू रस मिक्स करावा आणि ते पाणी गार झालेल्या फोडणीमध्ये टाकावे .

ढोकळा गार झाला की सुरी ने कापून घ्यावा व तयार केलेली फोडणी ढोकल्या वर पसरावी .कोथिंबीर ने गारनिष करून सर्व्ह करावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*