सुरळीच्या पाटवड्या

१ मोठी वाटी डाळीचे पीठ (बेसन)
१ मोठी वाटी आंबट ताक
१ मोठी वाटी पाणी
तिखट
मीठ
हळद
हिंग
फोडणी व कांदा – खोबर्‍याचे सारण

१/२ वाटी ओले खोबरे
१ मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर
१ मोठा बारीक चिरलेला कांदा
१ बारीक चिरुन हिरवी मिरची
मीठ
थोडी साखर
थोडे लाल तिखट
१ पळी तेलाची फोडणी (थंड करुन घालावी)

पाककृती

जाड बुडाच्या पातेल्यात डाळीचे पीठ, ताक, पाणी, तिखट, मीठ, हिंग, हळद घालुन मिश्रण सारखे करावे. गुठळी राहु देऊ नये. नंतर हे पातेले गॅसवर ठेवून मिश्रण डावेने ढवळत रहावे.
खाली लागू देऊ नये. मिश्रण दाटसर होत आले की झाकण ठेवून वाफ आणावी. वरील पातेल्यातील १/४ चमचा मिश्रण एका स्टीलच्या थाळीला पसरुन लावून पहावे.
गार झाल्यावर जर ते उचलले तर चटकन निघाले पाहिजे. ही मिश्रण शिजल्याची खूण आहे. जर असे चटकन निघाले नाही तर पुन्हा एक वाफ आणावी. नंतर मंद गॅसवर मिश्रण ठेवून द्यावे.
स्टीलची ३-४ ताटे पुसून अगदी कोरडी करावीत. नंतर प्रथम ताटाच्या आतल्या बाजूला मोठा डावभर मिश्रण घालावे व टेबलस्पून ताटाला सारवल्यासारखे करावे. हे काम खूप झटपट व कौशल्याने करावे लागते.
मिश्रण ताटभर होत आले की हाताला थोडे तेल लावून ताटभर सारवल्यासारखे करावे. नंतर ताट पालथे घालून त्यावर पुन्हा डावभर पीठ घालुन सारवावे. असे सर्व करुन घ्यावे.
सारणासाठी कांदा चिरावा. सर्व वस्तू एकत्र करुन त्यावर गार फोडणी घालावी. जेवढी ताटे झाली असतील त्याप्रमाणे सारणाचे भाग पाडून एकेका ताटावर सारण पसरवावे. सूरीने कापून अलगद हाताने वड्या गुंडाळाव्यात.
नवी/सोपी पाककृती

सांगितलेले साहित्य एकत्र करावे. नंतर हे पातेले साध्या कुकरमध्ये ४० मिनिटे गॅसवर ठेवावे. नंतर डावेने मिश्रण सारखे करावे व ताटावर पसरुन वड्या पाडाव्यात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*