साहित्य:- कणीक एक वाटी, तीन वाटी तळलेल्या पापडांची चुरी किंवा भाजलेल्या पापडांची चुरी (पापड उडीद किंवा मुगाचे) मीठ, लाल तिखट, पिठीसाखर, चवीनुसार आमचूर पावडर, अर्धा टी स्पून, मोहन, फोडणी, (हिंग, हळद, मोहरी).
कृती:- मीठ व मोहन घालून गव्हाची कणीक मळून घ्यावी. त्याच्या पातळ पोळ्या लाटा. तवा गरम करावा. आच मध्यम करावी. त्यावर पोळी टाकावी. बाजूने तेल सोडून कुरकुरीत खाकरा बनवावा.
खाकरे गार झाल्यावर त्याची चुरी करावी. खाकरा चुरीमध्ये पापड चुरी मिक्सस करावी. तेलामध्ये मोहरी, हिंग, हळद टाकून फोडणी करावी. खाकरा चुरीमध्ये फोडणी टाकावी. मीठ, पिठीसाखर, आमचूर पूड टाक, लाल तिखट टाका. मिक्सर करावी. खाकरा चिवडा तयार.
टीप:- आवडत असल्यास यामध्ये मुरमुरे चिवडा मिक्सा करावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply