आंब्याच्या पुऱ्या

साहित्य : दोन वाटय़ा मदा, एक टे. स्पून डालडाचे मोहन, अर्धा चमचा मीठ, थोडा हापूस आंब्याचा रस, एक चमचा साखर

कृती : आंब्याचा रस काढून ठेवावा. मद्याला तुपाचे मोहन चोळून घ्यावे. त्यात मीठ व थोडी साखर घालावी. मिक्सरमधून काढलेल्या आंब्याचा रस थोडा थोडा घालून पीठ भिजवावे. नंतर या पिठाच्या पुऱ्या लाटून तळाव्यात. केशरी रंगाच्या आंबट-गोड पुऱ्या चवीला छान लागतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*