चीझ कॉर्न रोल

साहित्य: चीज १ वाटी, हिरवी चटणी २ टे. स्पून, काळीमिरी पूड १ टे. स्पून, साबुदाण्याचे पीठ १ वाटी, स्मॅश केलेला बटाटा १ वाटी, कॉर्न १ वाटी, मीठ चवीनुसार, तेल आवश्यकतेनुसार.

कृती: प्रथम एका बाऊलमध्ये कॉर्न, चीज, हिरवी चटणी, काळीमिरी पूड, चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करुन घ्या. उकडलेला बटाटा, साबुदाण्याचे पीठ आणि चवीपुरते मीठ घालुन मिश्रण मळुन घ्या. बटाट्याचे रोल करुन त्यात कॉर्नचे मिश्रण स्टफ करा आणि नंतर रोल पीठात घोळवून तळुन घ्या. अश्याप्रकारे चीज कॉर्न रोल तयार.

Avatar
About खाद्यपदार्थ WhatsApp ग्रुप 71 Articles
श्री. संजीव वेलणकरांच्या ”मराठी खाद्यपदार्थ” या WhatsApp ग्रुपवरील पाककृती...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*